देशाच्या राजकारणात होत असलेले बदल दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्र हे याचे ताजे उदाहरण आहे, जिथे राज्यातील सर्वात बलाढ्य पक्ष समजल्या जाणाऱ्या शिवसेनेत आता दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असे लोकांना वाटत होते. मात्र याउलट महाराष्ट्राची धुरा आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शिंदे यांच्यावर सातत्याने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता या अभिनंदन पत्रांमध्ये दोन प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश झाला आहे. हे दोघे दुसरे तिसरे कोणी नसून, कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आहेत. दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. (kangana ranaut and vivek agnihotri congrats cm eknath shinde)
काय म्हणाली कंगना?
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबद्दलची नाराजी स्पष्ट आहे. उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने एक व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये ती उद्धव यांचा अभिमान मोडण्याबद्दल बोलत आहे. सोशल मीडियावर उद्धव यांना तिरस्कार दाखवल्यानंतर, आता कंगनाने एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक स्टोरी शेअर करत कंगनाने एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक केले. अभिनेत्रीने लिहिले, “त्यांची यशोगाथा किती प्रेरणादायी आहे… ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शक्तिशाली व्यक्तींपैकी एक बनण्यापर्यंत… अभिनंदन सर.”
काय म्हणाले विवेक?
यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जयघोष होत असून, विवेक अग्निहोत्री यांचा आवाजही या जयघोषात आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आणि आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले आणि लिहिले, “एकनाथ शिंदे तुमचे अभिनंदन आणि गतिमान नेतृत्वासाठी देवेंद्र फडणवीस तुमचेही अभिनंदन. अखेर, आता आपण न घाबरता जगू शकू. जय महाराष्ट्र.”
Congratulations @mieknathshinde
Congratulations @Dev_Fadnavis for your dynamic leadership.At least, now we can live without fear. #JaiMaharashtra
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) June 30, 2022
कंगना आणि विवेक यांनी भाजपला समर्थन देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे दोन्ही स्टार्स उघडपणे पक्षाला पाठिंबा देताना दिसले आहेत. यावेळीही तसेच झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्यानंतर बहुमताअभावी उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्याच्या संपूर्ण राजकारणाची उलथापालथ झाली आहे. परिणामी, राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला (भाजप) नवीन सत्ताधारी पक्ष म्हणून घोषित केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा