Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा बाहुबलीचे लेखक काढणार ‘आरएसएस’वर वेबसिरीज; घोषणा करत म्हणाले, ‘RSS ने गांधींना…’

बाहुबलीचे लेखक काढणार ‘आरएसएस’वर वेबसिरीज; घोषणा करत म्हणाले, ‘RSS ने गांधींना…’

 विजयेंद्र प्रसाद हे दाक्षिणात्य चित्रपट जगतातील लोकप्रिय लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी बाहुबली, आरआरआर सारख्या बिगबजेट सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले आहे. सध्या ते त्यांच्या एका नवीन घोषणेमुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांनी जर RSS नसता तर, काश्मीर झाला नसता, पाकिस्तानात विलीन झाला असता, आणि मग लाखो हिंदू मारले गेले असते असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी आरएसएसवर चित्रपट आणि वेबसिरीज काढणार असल्याचेही सांगितले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

नुकतेच विजयेंद्र प्रसाद यांनी विजयवाडा येथे आयोजित आरएसएसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राम माधव यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमादरम्यान विजयेंद्र प्रसाद यांनी आरएसएसवर एक चित्रपट आणि वेब सिरीज लिहिण्याची घोषणा केली. या कार्यक्रमात त्यांनी आरएसएसबद्दल त्यांचे विचार मांडले. या कार्यक्रमात त्यांंनी आरएसएसचे कौतुक करताना वेबसिरीज लिहणार असल्याचेही सांगितले.

ते म्हणाले, “मला तुम्हा सर्वांसमोर काहीतरी कबूल करायचे आहे. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत मला आरएसएसबद्दल फारसे काही माहीत नव्हते. मला वाटायचे की आरएसएसने गांधींना मारले. पण जेव्हा मला आरएसएसवर चित्रपट लिहिण्यास सांगितले गेले. मग मी नागपूरला गेलो आणि मोहन भागवतांना भेटलो. मी एक दिवस तिथे राहिलो आणि पहिल्यांदाच RSS म्हणजे काय हे समजले. मला खूप वाईट वाटले की इतक्या मोठ्या संघटनेबद्दल मला इतके दिवस माहित नव्हते.” ते पुढे म्हणाले, “जर RSS नसता, तर काश्मीर नसता, ते पाकिस्तानमध्ये विलीन झाले असते. आणि पाकिस्तानमुळे लाखो हिंदू मारले गेले असते.”

विजयेंद्र प्रसाद पुढे म्हणाले, “मला तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे, मी लवकरच काम सुरू करणार आहे. मी आरएसएसवर एक चित्रपट आणि वेब सिरीज बनवत आहे.” ते म्हणाले, “आरएसएसने चूक केली. स्वतःबद्दल लोकांना सांगू नका. ही पोकळी मी जमेल तितकी भरून काढेन. मी वचन देतो की आपण सर्वांनी आरएसएसच्या महानतेचा अभिमान बाळगावा याची मी खात्री करेन.” दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा उल्लेख अभिनेत्री कंगणा रणौतने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरही केला आहे.

हेही वाचा – खुशी कपूरच्या बोल्ड अदा! पाहा फोटो गॅलरी
पत्रकारासमोरचं विजय देवरकोंडाने केले ‘असे’ कृत्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
सारा अली खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! आगामी चित्रपटात ‘या’ महिला स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारणार अभिनेत्री

 

 

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा