आपल्या हटकेपणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘लॉक अप’ शोमुळे चर्चेत आहे. कंगना या शोमध्ये जितकी बिनधास्त दिसते, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही राहते. अलीकडेच कंगनाने सोशल मीडियावर इन्फ्लुएंसर अंजली अरोरा (Anjali Arora) हिला एज शेमिंग केल्याबद्दल फटकारले आहे.
अंजलीने काही दिवसांपूर्वी पायल आणि निशाबद्दल असे काही बोलले होते, ज्यामुळे कंगनाला खूप राग आला आणि या प्रकरणावर कंगना भडकली आणि तिने अंजलीला तिच्या पद्धतीने समजावून सांगितले. वीकेंडला जेव्हा कंगना लॉकअप स्पर्धकांना भेटायला आली, तेव्हा तिने अंजलीला विचारले की, ती तिला आंटी किंवा म्हातारी, काय म्हणणार? (kangana ranaut blast on anjali arora on age shaming kangana will you call me aunty)
खरं तर घडले असे, की एका टास्क दरम्यान पायल म्हणाली होती की, “अनुभवी लोकांसोबत उभे राहायला शिका… मुलांचे काम नाहीये हे.” पायलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अंजली म्हणाली होती की, “म्हणून वृद्धांनाही जागा नाही. मुलांसमोर म्हातारे उभे आहेत.” पायल आणि निशा अंजलीच्या बोलण्यावर चांगल्याच चिडल्या.
त्याच वेळी, वीकेंडला कंगनानेही अंजलीला फटकारले. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या वयाबद्दल काय सांगशील आंटी..म्हातारी? कारण मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. की तू मला बेहेनजी म्हणशील, का आंटी? कारण तू कोणाचाही आदर करत नाहीस.” कंगनाचे हे बोलणे ऐकून अंजलीने आपल्या स्पष्टीकरणात सांगितले की, तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती, त्यामुळे तिने रागाच्या भरात असे बोलले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :