Monday, July 1, 2024

‘पैशाने यश मोजणारे मूर्ख’, म्हणत कंगना रणौतने नाव घेता साधला ‘पठाण’वर निशाणा

बॉलिवूड अभिनेत्री आणि पंगा क्वीन कंगना रणौत अखेर ट्विटरवर परतली आहे. जवळपास अडीच वर्षांनी कंगनाची ट्विटरवर एन्ट्री झाली. ट्विटरवर आल्या आल्या कंगनाने पुन्हा एकदा फिलीम इंडस्ट्रीला टार्गेट करत ट्विट करण्यास सुरुवात केली आहे. कंगनाने कोणाचेही नाव न घेता ट्विट केले असून, ते ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मात्र कंगनाने ट्विट केल्यानंतर ते ट्विट तिने शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाला उद्देशून केल्याचे दिसत आहे. आजच शाहरुख खानचा पठाण प्रदर्शित झाला. प्रदर्शनाधीच सिनेमाने २४ कोटींची कमाई करत रेकॉर्ड केले. आता प्रदर्शनानंतर प्रेक्षकांचा चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

कंगना अतिशय फटकळ असून ती प्रत्येक गोष्टीवर तिचे मत बिनधास्त आणि बेधडक मांडत असते. कंगना आणि तिचे ट्विट नेटकऱ्यांमध्ये तुफान गाजतात. तिला तिच्या ट्विटमुळे अनेकदा वादांचा सामना करावा लागला आहे. आता कंगनाने केलेल्या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, “सिनेसृष्टी किती मुर्ख आहे, कोणताही केलेला प्रयत्न, एखादी निर्मिती किंवा कला ही किती यशस्वी झाली हे सांगण्यासाठी फक्त तिने किती रुपये कमावले हे सांगितले जाते. कलेचा दुसरा काहीच हेतू आणि पैलू नसल्यासारखे दाखवले जाते. सिनेसृष्टीचा दर्जा किती घसरला आहे? हेच यामधून स्पष्ट होत आहे. मंदिरांमधून जन्म घेतलेली कला पुढे चित्रपटगृहांपर्यंत पोहोचली. सिनेसृष्टी ही फक्त पैसे कमवण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे का तर नाही. कोटींमध्ये कमाई करण्यासाठी आणि मोजण्यासाठी ही चित्रपटसृष्टी सीमित नाही. म्हणून नेहमीच कलेचा आदर करा कोणत्याही व्यवसायाचा करू नका.” या ट्विटमध्ये कुठे शाहरुख खान किंवा पठाण सिनेमाचा उल्लेख नसला तरी ते शाहरुखच्या पठाण साठी असल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी कंगनाची कामाबद्दल बोलायचे झाल्यास लवकरच ती आणीबाणीवर भाष्य करणाऱ्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन ती स्वतःचा सांभाळत असून कंगनाने चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रसिद्ध बंगाली थिएटर अभिनेत्री बिनोदिनी दासी हिचाही बायोपिक पाइपलाइनमध्ये आहे. याशिवाय ‘सीता’ आणि ‘टिकू वेड्स शेरु’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

हेही वाचा-दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Oscar Nomintaions 2023: भारतामधील ‘नाटू नाटू’ गाण्याशिवाय ‘या’ डॉक्युमेंट्रीलाही जाहीर ऑस्कर नामांकन
‘मी अक्षरशः मला विसरते…’ म्हणत मधुराणी प्रभुलकरने शेअर केली तिला स्वतःचाच विसर पडणाऱ्या गोष्टीची पोस्ट

हे देखील वाचा