बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी शेरशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सोमवार (दि, 6 फेब्रुरवारी ) रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होत्या. यांच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनाही खूप आनंद झाला आहे. अशातच बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत हिने कियारा आणि सिद्धार्थच्या नात्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
कायमच चर्चेत असणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangna Ranaut) नेहमीच बॉलिवूडमधील होणाऱ्या घडामोडींवर आपलं मत व्यक्त करत असते. सध्या सर्वत्र कियारा अडवाणी (Kiara Advani)आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Soddharth Malhotra) यांच्या लग्नाचा गाजावाजा सुरु आहे. सोशल मीडियवरही यांच्या फटो आणि व्हिडिओची क्रेज पाहायला मिळत आहेत. अशताच कंगना रनौत हिने दखिल सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत जोडप्याचं कौतुक केलं असून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर सिद्धार्थ आणि कियाराचा एक व्हिडिओ स्टोरीला ठेवला असून कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे कपल किती सुंदर दिसत आहे..फिल्मइंडस्ट्रीमध्ये किंचितच खंर प्रेम पाहायला मिळतं. दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत.” त्याशिवाय कंगनाने या दोघांना टॅगही केलं आहे.सोशल मीडियावर कंगनाची स्टोरी तुफान व्हायल होत असून चाहत्याच्या पसंतीस उतरली आहे.
सांगायचं झालं तर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना (दि, 5 फ्रेब्रुवारी) पासून सुरुवात होणार आहे. त्याशिवाय लग्न सोहळ्यामध्ये जवळचे नातेवाइक आणि खास मित्रमंडळीच आमंत्रित असणार आहेत. या ग्रॅड लग्नसोहळ्यामध्ये ‘RC 15’ चा कोस्टार राम चरण (Ram Charan) देखिल हजेरी लावलणार आहे. त्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक मोठ मोठ्या हस्ती देखिल हजेरी लावणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा
सिद्धार्थ मल्होत्राला बळजबरी कियारा अडवाणीला करावा लागलं होतं किस, वाचा तो रंजक किस्सा
स्टानर! ऑरेंज ड्रेसमध्ये पपया दिसतेय रकुल प्रीत, पाहाच एकदा फोटो गॅलरी