Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेल’, स्वातंत्र्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा बरळली कंगना

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. यापैकीच एक ‘पंगा क्वीन’ म्हणजेच, कंगना रणौत होय. कंगना आपल्या फटकळ स्वभावासाठी ओळखली जाते. ती देशात सुरू असलेल्या प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसते. अशावेळी ती वादही ओढवून घेते. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. कंगनाने स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यानंतर तिच्याविरुद्ध सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आणि बड्या नेत्यांनी मोर्चे सुरू केले आहेत.

देशाला सन १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला कंगनाने “भीक” सांगून वाद ओढवला आहे. मात्र, या प्रकरणावर कंगनाने आपले मत मांडले आहे. कंगना पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार आहे. मात्र, तिने इथे एक अटही ठेवली आहे. (Actress Kangana Ranaut Defended Herself After Being Slammed For Her Freedom Remark)

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की, “१९४७ मध्ये मिळालेले स्वातंत्र्य ‘भीक’ होते आणि जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते २०१४ मध्ये मिळाले आहे.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाने लिहिले की, “मी मुलाखतीत सर्व काही स्पष्ट केले होते. सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांसारख्या महान लोकांच्या बलिदानाने १८५७ मध्ये स्वातंत्र्याचा पहिला सामूहिक लढा सुरू झाला. मला १८५७ ची लढाई माहित आहे, पण १९४७ मध्ये कोणते युद्ध लढले गेले ते माहित नाही. जर कोणी मला सांगू शकले, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करेल आणि माफीही मागेल. कृपया यामध्ये मला मदत करा.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाने पुढे लिहिले की, “मी झांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनलेल्या चित्रपटात काम केले आहे. १८५७ च्या युद्धावर बरेच संशोधन झाले आहे. राष्ट्रवादाबरोबरच उजव्या विचारसरणीचाही उदय झाला, पण तो अचानक कसा संपला? आणि गांधीजींनी भगतसिंगांना का मरू दिले. शेवटी नेता बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

“शेवटी, विभाजनाची रेषा एका इंग्रजाने का ओढली? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ज्यात मला मदत हवी आहे. जोपर्यंत २०१४ च्या स्वातंत्र्याचा संबंध आहे, मी विशेषत: असे म्हटले होते की, आपण जे भौतिक स्वातंत्र्य मिळवू शकतो, लोक प्रथमच इंग्रजी न बोलल्यामुळे किंवा लहान शहरांमधून आलेले किंवा भारतात बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्यासाठी आपल्याला लाज वाटू शकत नाहीत. जे चोर आहेत, त्यांची तर जळणारच. कोणीही विझवू शकत नाही… जय हिंद,” असेही पुढे बोलताना कंगना म्हणाली.

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगनाविरुद्ध देशातील अनेक भागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेकांनी तिला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याची मागणीही केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जबरदस्त! एनएफटी मार्केटमध्ये चित्रपट विकणारे राम गोपाल वर्मा ठरले पहिले निर्माते, एकाच झटक्यात कमावले…

-कर्नाटक वन विभागातील हत्तीच्या पिल्लाला देण्यात आले सुपरस्टार पुनीत राजकुमारचे नाव, सदैव राहणार आठवणीत

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा