Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने; म्हणाली, ‘हा माणुस…’

अभिनेत्री कंगना रणौतने पंतप्रधान मोदींवर उधळली स्तुतिसुमने; म्हणाली, ‘हा माणुस…’

देशभरात सध्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची धून सर्वत्र पाहायला मिळत आहे. सामान्य जनतेसह बॉलिवूड जगतातील कलाकारही हा दिवस मोठ्या जल्लोशात पार पाडताना दिसत आहेत. अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन देशवासियांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

बॉलीवूड इंडस्ट्रीची क्वीन आणि आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली कंगना या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत असल्याने तिला विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही. कंगना गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यू आणि तापाने त्रस्त आहे. मात्र आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वजण देशप्रेमात तल्लीन झाले आहेत. अशा परिस्थितीत, आजारी असतानाही अभिनेत्री कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, अभिनेत्री कंगना रणौतने आज तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये देशवासियांसाठी एक नोट लिहिली आहे. यामध्ये तिने  ‘मी माझ्या खोलीतून बाहेर पडू शकत नाही, पण या राष्ट्रीय सणाची भावना मला सर्वात शक्तिशाली वाटते. माझ्या घरात काम करणारे लोक, नर्स आणि माळी, प्रत्येकजण एकमेकांना अभिनंदन करत आहेत.’

कंगनाने पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत लिहिले, “मी आज सकाळी माननीय पंतप्रधानांचे भाषण ऐकले. लोक म्हणतात की एक व्यक्ती जग बदलू शकते आणि हे म्हणणे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अगदी खरे आहे. लोकांमध्ये राष्ट्रवाद, कर्तव्य आणि आशावाद इतका उत्साह मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही. हे असे लोक आहेत जे केवळ उठू शकत नाहीत तर शेकडो किंवा हजारो नव्हे तर संपूर्ण मानवतेचा उद्धार करू शकतात. जय हिंद.”

सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा – पतीच्या निधनानंतर दोन महिन्यातच मीनाचा मोठा निर्णय, ‘हा’ अवयव करणार दान
‘देशातला द्वेष थांबवा’ अभिनेत्री तापसी पन्नूचे स्वातंत्र्यदिनी आवाहन, नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
नोरा फतेहीच्या आईने आणले लग्नासाठी स्थळ, दाखवले एका पेक्षा एक सरस मुलांचे फोटो

हे देखील वाचा