Saturday, June 29, 2024

कंगणा रणौतचा ‘धाकड’ चित्रपट झाला ऑनलाईन लिक, कमाईवर होणार थेट परिणाम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) ‘धाकड’ चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. हा चित्रपट शुक्रवार (२०मे) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.पण आता या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. कंगना रणौतचा ‘धाकड’ (dhakad) हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मात्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनाच या बातमीने जोरदार धक्का बसला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, कंगना राणौतचा ‘धाकड’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये अनेक वेबसाईटवरून लीक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाला फटका बसेल असा धोका सगळीकडून व्यक्त केला जात आहे, कारण लोक हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याऐवजी ऑनलाइन डाउनलोड करून पाहण्यास सुरुवात करतील. मात्र, हा चित्रपट लॅपटॉप किंवा मोबाईलवर नाही तर थिएटरमध्येच बघायला मजा येईल. कारण चित्रपटाची कथाच प्रचंड भव्यदिव्य बनवण्यात आली आहे.पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झालेला ‘धाकड’ हा पहिला चित्रपट नाही.

याआधीचे ‘भूल भुलैया 2’, ‘हिरोपंती 2’, ‘रनवे 34’, ‘अर्चाया’ आणि रणवीर सिंगचे ’83’ सारखे चित्रपटही रिलीजच्या दिवशीच ऑनलाइन लीक झाले आहेत. रजनीश घई दिग्दर्शित कंगना राणौतचा ‘धाकड’ हा स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे. याची निर्मिती दीपक मुकुट आणि सोहेल मकलाई यांनी केली आहे. कंगना राणौतचा हा पहिला एक्शन सिनेमा आहे, ज्यामध्ये तिने धोकादायक स्टंट केले आहेत. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी काम केले आहे, जे नकारात्मक भूमिकेत आहेत. याआधी कंगना राणौत शेवटची ‘थलायवी’ चित्रपटात दिसली होती. उत्कृष्ट अभिनयानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकला नाही. आता कंगनाला ‘धाकड’ चित्रपटाकडून खूप आशा आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा