बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे नाव बॉलिवूडविषयी तसेच इतर मुद्द्यांबाबत आपले मत व्यक्त करणार्या सेलिब्रिटींमध्ये अव्वल स्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा कहर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्याच वेळी, अलीकडेच अनेक कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कंगना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून तिने मास्क न घातल्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.
कंगना रणौत नुकतीच डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट झाली. पांढऱ्या सूटमध्ये कंगना बरीच सुंदर दिसत होती. परंतु तिने मास्क न लावल्यामुळे, सोशल मीडिया युजर्सने तिला जोरदार ट्रोल केले आहे. व्हायरल भयानीने शेअर केलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर बराच प्रतिसाद मिळत आहे.
तसेच, या व्हायरल व्हिडिओवर काही कलाकारांनीही कमेंट केली आहे. टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंटने लिहिले की, “ही कधीच मास्क नाही लावत, हिच्या हातात सुद्धा मास्क नाही. असे कसे?” त्याचबरोबर, किश्वरचा पती आणि टीव्ही अभिनेता सुयश रायने लिहिले की, “जगाला ज्ञान देण्यासाठी आघाडीवर उभे असतात, मूर्खपणा शिगेला पोहोचला आहे.” किश्वर आणि सुयशशिवाय अन्य काही कलाकारांनीही यावर कमेंट केली आहे.
कंगणाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे नुकतेच रिलीझ करण्यात आले आहे, जे चाहत्यांनी चांगलेच पसंत केले. ‘थलायवी’शिवाय कंगनाकडे ‘तेजस’ आणि ‘धाकड’ हे चित्रपटही आहेत. या दोन्ही चित्रपटांची झलक कंगनाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-यो यो हनी सिंगने केला आई- वडिलांचा वाढदिवस साजरा, फोटोला मिळाले ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स
-एकदम कडक! ‘टॉप टकर’ गाण्यावर थिरकली ‘नॅशनल क्रश’, वाढदिवसानिमित्त व्हिडिओची सोशल मीडियावर धमाल