Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड कंगनाने केली ॲनिमलवर टीका; फक्त ड्रग्ज करूनच सगळे मजा घेत आहेत…

कंगनाने केली ॲनिमलवर टीका; फक्त ड्रग्ज करूनच सगळे मजा घेत आहेत…

अभिनेत्रीतून राजकारणी बनलेली कंगना रणौत अनेकदा तिच्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कंगना राणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तीने ॲनिमल या चित्रपटाबद्दल तिची प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले आहे की, चित्रपटात फक्त ड्रग्ज करून सगळेच मजा घेत आहेत. 

कंगना म्हणाली, “तुम्ही आता कोणताही चित्रपट पाहा. तो बॉक्स ऑफिसवर कसा गोंधळ निर्माण करतो. हे सगळं बघून हे लोक कुठून टाळ्या वाजवायला आणि शिट्ट्या मारायला बाहेर पडतात? असं वाटतं. त्यातली पोरं कुऱ्हाड घेऊन बाहेर पडली. मारायला आणि मरायला सुद्धा. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही त्यांना पडत नाही. तो मुलगा मशीनगन घेऊन शाळेत काय जातोय. जणू काही पोलीस अस्तित्वातच नाहीत. जणू त्यांचा काही परिणामच होत नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे का ? तेथे रक्तपात झाला आहे, मृतदेहांचे ढीग भरले आहेत आणि यांची मौजमजा सर्रासपणे सुरू आहे. ना ती लोककल्याणासाठी आहे, ना तीला काही सीमा आहे. हे लोक बॉक्स ऑफिसवर कोणत्या प्रकारचे पितृसत्ताक चित्रपट बनवतात? हे कुठून येत आहेत?

ॲनिमल गेल्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी दावा केला होता की, मला एक दिवस कंगनासोबत काम करायला आवडेल. मात्र, “कृपया मला कधीही कोणतीही भूमिका देऊ नका अन्यथा तुमचे अल्फा मेल हिरो स्त्रीवादी होतील आणि मग तुमचे चित्रपटही फ्लॉप होतील. तुम्ही ब्लॉकबस्टर्सच बनवा. चित्रपटसृष्टीला तुमची गरज आहे.” असे म्हणत कंगनाने ही ऑफर नाकारली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

फरहान ने सांगितले ‘दिल चाहता है’ चे किस्से; आमिर साठी अक्षय खन्नाने सोडली होती भूमिका…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा