कंगना रनौट सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असलेल्या अभिनेत्रींपैकी एक. वेळोवेळी ती बॉलीवूडमधील कोणत्याही घटनेवर बोलते व योग्य वाटेल तेथे टीका करायलाही मागे पुढे पाहात नाही. त्यातच तिचा व अभिनेत्री दिपीका पदुकोनचा वाद आता चाहत्यांना काही नविन नाही. आता पुन्हा एकदा याच कंगनाने दिपीकावर ट्विटर हल्ला केला आहे.
दरवर्षी १० ऑक्टोबर हा ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून कंगनाने दिपीकावर निशाना साधला आहे. कंगनाने ट्विट करत आपलाच चित्रपट जजमेंटल है क्या या चित्रपटाचे उदाहरण देत सिनेमा पाहायला सांगितला आहे.
आपल्या ट्विटमघ्ये कंगना लिहीते, “आम्ही जो चित्रपट तयार केला त्याला लोकांनी कोर्टात नेले. हे तेच लोक होते जे डिप्रेशनच दुकान चालवतात. यानंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. यामुळे मार्केटिंगवर खूप परिणाम झाला. असे असले तरी हा एक चांगला चित्रपट आहे. या चित्रपटाला तुम्ही आजच पाहा.”
दिपीका पदुकोन ही अशी एक अभिनेत्री आहे जी सतत डिप्रेशन या विषयावर बोलते. सार्वजनिक ठिकाणी तीने ती स्वत: डिप्रेशनमध्ये राहिल्याचे कबूल केले आहे. काही दिवसांपुर्वीच दिपीकाने डिप्रेशनवर एक ट्विट केला होता. त्यानंतर कंगनाने दिपीकावर निशाना साधला होता.
सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्जचा अँगल आला तेव्हा कंगनाने ट्विट केला होता. “नैराश्य हे ड्रगच्या गैरवापराचा परिणाम आहे. उच्चवर्गीय सोसायटीमधील श्रीमतांची स्टार किड्स अर्थात मुलं ही आपल्या मॅनेजरकडे माल आहे का असे विचारतात,” असा ट्विट केला होता.










