Tuesday, July 9, 2024

Kangana Ranaut : अवैध गोष्टींमध्ये बॉलिवूड कलाकार; कंगनाचा मोठा खुलासा, सरकारला केली कारवाईची मागणी

बॉलिवूडची ड्रामा क्विन कंगना रणौत (Kangana ranaut ) आणि वाद हे समीकरण सर्वश्रुत आहे. कंगना अनेक घटनांवर आपलं परखड मत व्यक्त करत असते. अनेकदा तिच्या निशाण्यावर बॉलिवूड कलाकार असल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतंच कंगनाने बॉलिवूड कलाकारांसंदर्भात मोठं वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंगनाने (Kangana ranaut )नुकतीच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने आरोप केला आहे की, अनेक लोकप्रिय कलाकार व्हॉट्सअप आणि मेल हॅक करण्यासाठी डार्क वेबचा वापर करतात. तसेच, अवैध गोष्टींमध्ये बॉलिवूड कलाकार फसले असल्याचेही कंगनाने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर कंगनाने सरकारला कारवाईची मागणी देखील केली आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

नेमकं काय म्हणाली कंगना?
अनेक लोकप्रिय कलाकार डार्क वेबशी संबंध ठेवून आहेत. ते केवळ तिथल्या कंटेन्टचा आस्वाद घेतात असं नाही तर अनेकांचे व्हॉट्सॲप आणि ई-मेलही हॅक करतात. याचा सखोल तपास केल्यास अनेक मोठी नावं समोर येतील, असं तिनं म्हटलं आहे. तसेच केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. अशी मागणीदेखील अभिनेत्रने केली आहे. तिच्या या पोस्टनंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Kangana Ranaut Makes SHOCKING Allegation About ‘Illegal Stuff’ In Bollywood

तसेच, यावेळी कंगनाने ट्रायच्या एका निर्णयाचे स्वागत केले. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं (TRAI) नुकताच एक नियम केला आहे. त्यामुळं आता एखादा फोन कॉल आल्यास त्या व्यक्तीचा नंबरही आपल्या फोनवर दिसणार आहे. याच निर्णयाचे कंगनाने कौतुक केलं आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, कंगनाचा ‘तेजस’ हा चित्रपट नुकताच झळकला होता. आता ती ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही ती करत आहे. चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार, कंगना ‘कन्नप्पा’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात विष्णू मंचू मुख्य भूमिकेत आहे. प्रभास आणि मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ करणार असल्याचं बोलल जात आहे. या चित्रपटात प्रभास भगवान शिवाची भूमिका साकारणार असून विष्णू त्याच्या भक्ताची भूमिका साकारणार आहे.

हे देखील वाचा