Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘उद्या तुझा गर्व तुटेल!’ कंगनाचा उद्धव ठाकरेंविरोधातचा जुना व्हिडिओ व्हायरल, ‘असं’ का बोलली होती अभिनेत्री?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या काहीही ठीक चाललेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सिंहासन धोक्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून, त्यानंतर आता उद्धव ठाकरे राजीनामा देऊ शकतात, असे बोलले जात आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना राणौत उद्धव ठाकरेंचा अभिमान भंगणार असल्याचं बोलत आहे.

खरं तर, कंगना रणौतचा हा व्हिडिओ २०२०चा आहे, जेव्हा बीएमसीचा बुलडोझर अभिनेत्रीच्या ऑफिसवर चढला होता. त्या दिवसांत अभिनेत्रीने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एक भविष्यवाणी केली होती, जी आता चर्चेत आहे. कंगना व्हिडिओमध्ये म्हणाली होती की, “उद्धव ठाकरे, तुम्हाला काय वाटते, तुम्ही माझ्याशी बदला घेतलाय? आज माझं घर तुटलाय, उद्या तुमचा अभिमान तुटेल.” याशिवाय कंगना रणौतचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणताना दिसत आहे की, “जेव्हा पुरुष एखाद्या महिलेचा अपमान करतो, तेव्हा त्याचे पडसाद नक्कीच पडतात.” (kangana ranaut old statement against uddhav thackeray video goes viral)

कंगना रणौतचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि यूजर्सही यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “एकदा कंगना म्हणाली होती, आज माझे घर तुटले, उद्या तुझा अभिमान तुटेल.” तर आणखी एका यूजरने लिहिले की, “कंगना रणौतचा अंदाज योग्य दिशेने जात आहे.” त्याचप्रमाणे कंगनाच्या व्हिडीओवर बरेच लोक आपली बाजू मांडत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

 

हे देखील वाचा