साल २०१९ मध्ये मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) यांनी कंगना रणौतबद्दल (Kangana Ranaut) एक वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, जर त्यांना एखादी मुलगी असती, तर ती कंगनासारखीच असती. आज म्हणजेच गुरुवारी (३० जून) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने रेखाच्या व्यक्तव्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. याला उत्तर देताना कंगनाने, ही तिची आजपर्यंतची सर्वात मोठी प्रशंसा असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाल्या होत्या रेखा?
साल २०१९मध्ये मुंबईतील मराठी गौरव कार्यक्रमादरम्यान कंगना रणौतने रेखा यांना विशेष पुरस्कार दिला होता. त्यादरम्यान कंगना रेखाने तिला गिफ्ट केलेल्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पुरस्कार स्वीकारताना रेखाने कंगनाचे कौतुक केले आणि कंगनावर त्यांचे खूप प्रेम असल्याचे सांगितले. ‘मला मुलगी असती तर ती कंगनासारखी असती’ असंही रेखा म्हणाल्या. अलीकडेच एका चाहत्याने रेखाचा हा जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याच वेळी, कंगना रणौतनेही हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पुन्हा शेअर केला आणि लिहिले ‘सर्वात मोठी प्रशंसा’. (kangana ranaut reaction on rekha’s statement about her)
कंगना रणौतचे वर्कफ्रंट
कंगना रणौतने २००६ मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती लवकरच तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये कंगना भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिच्याकडे ‘इमर्जन्सी’ हा चित्रपटही आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाला या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा