Monday, July 1, 2024

फटाक्यांच्या बंदीवर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मग ऑफिसला पण गाडी घेऊन नका जाऊ…’

दिव्यांचा सण दिवाळी अवतरला असून, सर्वत्र त्याची झगमगाट पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण सणाची खरेदी करत असतात. मिठाईपासून ते नवीन कपडे आणि दिव्यांपासून ते कंदीलपर्यंत सुंदर वस्तूंची खरेदी केली जाते. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा फटाक्यांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फटाक्यांवर बंदी घालणे आणि त्याचा वापर न करणे, त्यामुळे प्रदूषण होते, असा मुद्दा उपस्थित केला जातो.

फटाक्यांच्या बंदीवर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया
त्याचबरोबर इतर सण, लग्नसमारंभात फटाक्यांची आतिषबाजी होत असताना केवळ दिवाळीतच अशा गोष्टी का बोलल्या जातात, असे अनेकांचे म्हणणे आहे. आता नुकतीच स्पष्टवक्ता अभिनेत्री कंगना रणौतनेही या विषयावर आपले मत मांडले आहे. फटाके न फोडण्याच्या मुद्द्यावरही कंगनाने असहमती दर्शवली आहे. सद्गुरूंचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवड शेअर करत तिने लिहिले की, पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या लोकांनी या तीन दिवस वाहनांचाही वापर करू नये. (kangana ranaut reacts on fire crackers ban on diwali)

कंगना रणौत नेहमी मोकळेपणाने बोलत असते आणि कोणत्याही मुद्द्यावर आपले मत मांडताना ती कधीच मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सद्गुरु त्यांच्या दिवाळीच्या लहानपणीच्या आठवणी सांगत आहेत. दिवाळी सुरू होण्याच्या एक महिना अगोदरच ते फटाके कसे पेटवायचे आणि नंतरच्या साठी काही जपून ठवायचे, हे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलंय की, “ही तीच व्यक्ती आहे, ज्यांनी लाखो झाडे लावून ग्रीन कव्हरचा विश्वविक्रम केला आहे.” यासोबत तिने पुढे लिहिले की, “हे त्या सर्व दिवाळी पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी योग्य उत्तर आहे. मग तुम्ही तुमच्या ऑफिसला जा आणि तीन दिवस वाहने वापरू नका.”

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

त्याच वेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी असे आहेत, जे लोकांना दिवाळीत फटाके न फोडण्याचे आणि प्रदूषणाकडे लक्ष देण्याचे आवाहन करत आहेत. रिया कपूर म्हणाली की, “फटाके फोडणे ही अत्यंत बेजबाबदार वृत्ती आहे, हे करणे बंद करा.” दुसरीकडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “फटाके हा दिवाळीचा महत्त्वाचा भाग आहे आणि तो तसाच असायला हवा. मात्र, फटाके वाजवताना, त्याचा आवाज आणि प्रदूषण इतरांना त्रास देत नाही, हे लक्षात ठेवा.”

दिल्लीत गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाही दिवाळीत फटाक्यांची विक्री, साठवणूक आणि वापरावर बंदी असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती पाहता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-जॅकी चॅनचे उदाहरण देत कंगना रानौतने पोस्टद्वारे साधला शाहरुख खानवर निशाणा

-कंगनाने सांगितले समंथा अन् नागा चैतन्यच्या घटस्फोटाचे कारण, तर ‘या’ अभिनेत्याला म्हणाली, ‘डिव्हॉर्स एक्सपर्ट’

हे देखील वाचा