Wednesday, July 3, 2024

ऐकलंत का! कंगनाला करायचंय लग्न, पुढील पाच वर्षात स्वत:ला बघतेय आईच्या भूमिकेत

अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्टपणे तिचे मत मांडत असते. कोणत्याही मुद्यांवर तिचे मत मांडताना ती जास्त विचार करत नाही. नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने सांगितले की, ती कोणासोबत तरी रिलेशनमध्ये आहे. तिने हा खुलासा केल्यानंतर तिचे चाहते खूप खुश झाले आहेत.

एवढंच नाही, तर तिने हे देखील सांगितले की, लग्नानंतर पाच वर्षातच तिला बाळ हवे आहे. ती लवकरच तिच्या बॉयफ्रेंडबाबत माहिती देणार आहे. हा खुलासा तिने तिला ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्यानंतर केला आहे. (Kangana Ranaut reveal her relationship status says you will know about my partner soon)

मुलाखतीत तिला विचारले की, “पुढच्या पाच वर्षात तू स्वतः ला कुठे बघते?” त्यावेळी तिने उत्तर दिले की, “मला लग्न करायचे आहे आणि मला मुलं देखील हवी आहेत. पुढील पाच वर्षांत मी स्वतःला एका आईच्या रुपात बघते.”

कंगनाला विचारले की, “ती आई आणि पत्नी या कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे का? यावर तिने हसून “हो,” असे उत्तर दिले. यानंतर तिला तिच्या जोडीदाराबाबत विचारले, तेव्हा तिने लवकरच समजेल असे उत्तर दिले. यानंतर तिला विचारले की, “ती प्रेमात आहे का?” यावर तिने “हो,” असे उत्तर देऊन बाकी गोष्टी लवकरच समजतील असे सांगितले.

कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच ती ‘तेजस’, मणिकर्णिका रिटर्न्स: द लेजेंड ऑफ जिद्दा’, ‘धाकड’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती एक अभिनेत्रीसोबत निर्माती देखील आहे. तिने तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. साई कबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा