Saturday, July 6, 2024

‘भीक’चे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कंगनाने शेअर केला तिचा ग्लॅमरस फोटो; म्हणाली, ‘एक गाणे…’

कंगना रणौत ही इंडस्ट्रीतील वादग्रस्त अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत येते. नुकतेच कंगनाने एक असे वक्तव्य केले, ज्याने मोठा वाद निर्माण झाला आणि आता तो शांत होण्याचे नाव घेत नाहीये. खरे तर, कंगनाने एका खासगी मुलाखतीत सांगितले की, “१९४७ मध्ये जे मिळालं ते स्वातंत्र्य नव्हे, तर भीक होतं. खरं स्वातंत्र्य आपल्याला २०१४ मध्ये मिळालं आहे.”

वादादरम्यान शेअर केला फोटो
आता कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चौफेर टीका होत आहे. इतकेच नव्हे, तर तिच्यावर उदयपूर-चुरू आणि जोधपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, या सर्व वादाच्या दरम्यान, कंगनाने कोणतीही चिंता न करता, इंस्टाग्रामवर स्वतःचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. तसेच एक कॅप्शन देखील लिहिले आहे, जे जोरदार व्हायरल होत आहे. (kangana ranaut share glamrous photo in her freedom statement controversy)

फोटो शेअर करत कंगनाने लिहिले की, “माझ्या डोक्यात एक गाणे सतत वाजत आहे. मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम…” आता कंगनाच्या या बेफिकीर स्टाइलवर युजर्स सर्व विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “पुढील पुरस्काराची तयारी.” त्याचवेळी एका युजरने लिहिले, “भारत या देशातील महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही.” दुसरीकडे, काही युजर आहेत ज्यांनी कंगनाच्या या फोटोचे कौतुक केले आहे आणि हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “अभिनेत्री कंगना रणौतच्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. केंद्राने त्यांच्याकडून पद्मश्री परत घेऊन त्यांना अटक करावी.” आता हा वाद आणखी किती वाढतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा