Wednesday, January 28, 2026
Home बॉलीवूड ‘इंडस्ट्रीमध्ये पहिले वर्ष, पण ऍटिट्युड तेव्हाही असाच’, कंगना रणौतने शेअर केला करण जोहरसोबतचा ‘तो’ व्हिडिओ

‘इंडस्ट्रीमध्ये पहिले वर्ष, पण ऍटिट्युड तेव्हाही असाच’, कंगना रणौतने शेअर केला करण जोहरसोबतचा ‘तो’ व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे‌ चर्चेत असते. देशातील राजकारण असो किंवा बॉलिवूड ती प्रत्येक गोष्टीत अगदी बिनधास्तपणे तिचे मत मांडत असते. काही वर्षापूर्वी कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यात कडाडीचे भांडण झाले होते. त्या दोघांमधील हे मतभेद खूप जुने आहेत. हे कंगनाने नुकतेच एक व्हिडिओ शेअर करून सिद्ध केले आहे.

कंगना नेहमीच बॉलिवूडमधील निपोटिझमबाबत वक्त्यव करत असते. ती अनेकवेळा मूव्ही माफियावर निशाणा साधताना दिसली आहे. अशातच तिने इंस्टाग्राम स्टोरीला फिल्म फेअर अवॉर्डचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करण जोहरला इग्नोर करताना दिसत आहे. (Kangana Ranaut shared a video, when ahe ignore him at award function)

या व्हिडिओमध्ये करण जोहर अवॉर्ड शो होस्ट करत असतो. तेव्हा तो एका अवॉर्डसाठी कंगनाला बोलावतो. अवॉर्ड घेतल्यानंतर कंगना मंचावरून खाली जात असते तेव्हा करण स्वतःकडे तिचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. परंतु कंगना त्याला इग्नोर करत निघून जाते.

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझा ऍटिट्युड आधीपासूनच खूप खराब आहे.” तिने दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इंडस्ट्रीमध्ये हे माझे पहिले वर्ष होते. मी किशोरवयीन होते परंतु ऍटिट्युड तेव्हाही असाच होता.” तिने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चचा विषय बनत आहे. तसेच आता या पोस्टनंतर कंगना आणि करणमधील वाद वाढण्याची अनकेजण शक्यता व्यक्त करत आहेत.

Photo Courtesy: Instagram/kanganaranaut

कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच ती ‘थलायवी’ आणि ‘तेजस’, ‘मणिकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ जिद्दा’, ‘टिकू वेड्स शिरू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फटाक्यांच्या बंदीवर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘मग ऑफिसला पण गाडी घेऊन नका जाऊ…’

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

-जॅकी चॅनचे उदाहरण देत कंगना रानौतने पोस्टद्वारे साधला शाहरुख खानवर निशाणा

हे देखील वाचा