Tuesday, July 9, 2024

‘पद्मश्री’ कंगना.! अस्सल अभिनयच बोलतोय; कंगनाकडून भावनांना वाट, ‘मला नम्र आणि सन्मानित वाटतंय’

राष्ट्रपती भवनामध्ये सोमवार रोजी (दिनांक 8 नोव्हेंबर 2021) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते एकूण 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) देखील समावेश होता. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण 119 पद्म पुरस्कारार्थींपैकी 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री कंगना रनौतला महामहिम राष्ट्रपतींनी ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला. यावेळी कंगना अत्यंत आनंदी असलेली दिसली.

कंगनाला सिनेमा क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल 2020 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. कंगनाला सन्मानित करण्यात आले, त्यावेळी तिच्यासोबत बहिण रंगोली ही देखील उपस्थित होती. (Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020)

पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने आपल्या भावनांना वाट करुन दिली. यावेळी तिने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. पद्मश्री मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना कंगना म्हणाली की, “मला खूप नम्र आणि सन्मानित वाटत आहे. या सन्मानासाठी मी माझ्या देशाचे आभार मानते आणि स्वप्न पाहण्याची हिंमत करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला मी तो समर्पित करतो. प्रत्येक मुलीला, प्रत्येक आईला आणि त्या महिलांच्या स्वप्नांसाठी जे आपल्या देशाचे भविष्य घडवतील.” असे कंगनाने व्हिडिओत म्हटले आहे.

कंगना रनौतची कारकीर्द…

कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या सिनेमांतील अभिनयासाठी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कंगना ही तिच्या बिंधास्त आणि अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे. तिला सिनेक्षेत्रात पदार्पणातच ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘गँगस्टर’पासून सुरू झालेला तिच्या या प्रवासात तिने, ‘वो लम्हें’, ‘फॅशन’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘तनू वेड्स मनू’ आदी चित्रपटांत आपला प्रभाव दाखवला.

हेही वाचा –

लय भारी! बॉलिवूड कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘पद्मश्री’ पुरस्कारावर कोरले आपले नाव

‘यामुळे’ जरा थकवा आलाय! अभिनेते खासदार अमोल कोल्हे जाणार एकांतवासात, पोस्ट करुन सांगितले कारण

सुशांतचे जुने चॅट, इमेल पुन्हा मिळवण्यासाठी सीबीआयने अमेरिकेकडे डेटा रिकव्हरसाठी मागितली मदत

हे देखील वाचा