कंगना रणौत बॉलिवूडमधील पंगा गर्ल. आपल्या अभिनयासोबतच बेधडक व्यक्त्यांमुळे सतत वादांमध्ये अडकणारी अभिनेत्री. समोर कोण आहे याचा विचार न करता तिला त्या व्यक्तीबद्दल जे काही वाटते ते ती बिनधास्तपणे बोलते. तिच्या अशा या वृत्तीमुळे तिला अनेकदा किंबहुना रोजच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. अशातच आज ती तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या या वाढदिवसाच्या खास दिनी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे.
कंगनाने आजच्या खास दिवशी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक व्यक्तीची माफी मागितली आहे. यात आईवडिलांसह, गुरु आणि शत्रू देखील सामील आहेत. तिच्या बोलण्याने ज्यांची मनं दुखावली गेली आहेत अशा सर्वांची तिने माफी मागितली. तिने तिच्या गुरूंचे (सद्गुरु आणि स्वामी विवेकानंद) त्यांच्या शिकवणीबद्दल आभार मानून कंगना म्हणते, “माझ्या शत्रूंनी, ज्यांनी मला आजपर्यंत कधीही आराम करू दिला नाही. कितीही यश मिळाले तरी मला यशाच्या वाटेवर कायम ठेवले. मला लढायला शिकवले, संघर्ष करायला शिकवले, मी त्यांची सदैव ऋणी राहीन.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणते, “मित्रांनो माझे वीचे खूपच सरळ आहेत. माझे आचरण आणि वीचे देखील सरळ आहेत. मी नेहमीच सर्वांचे चांगलेच इच्छिते. यामुळेच जर मी कोणासाठी एखाद्या गोष्टीमुळे मन दुखावले असेल, माझ्या बोलण्यामुळे कोणाला ठेस लागली असेल तर मी माफी मागते. माझ्या मनात सर्वांबद्दल केवळ प्रेम, सुविचार आहेत.” दरम्यान, कंगना रणौत लवकरच तिच्या आगामी ‘चंद्रमुखी २’ सिनेमात दिसणार आहे. सोबतच ती इमर्जन्सी मध्ये देखील दिसेल.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”
‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य