वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांना देशाकडून सन्मान प्रदान केले जातात. बॉलिवूडमधील देखील विविध कलाकरांना भारत सरकारकडून काही विशेष पुरस्कार दिले जातात. त्यातले मुख्य पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार. दरवर्षी हे पुरस्कार त्या त्या मान्यवरांना दिले जातात. यावर्षी नुकतेच या पुरस्करांचे वितरण करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या हस्तींना या मनाच्या सन्मानाने गौरवण्यात आले. यातलेच एक मोठे नाव म्हणजे बॉलिवूडची क्वीन, पंगा क्वीन कंगना रानौत. कंगनाला पदमश्री पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. यासोबतच या व्हिडिओमध्ये तिने अनेकांना चिमटे देखील काढले आहेत.
कंगनाने शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “मित्रानो एक कलाकार या नात्याने मला खूप जास्त प्रेम, मान, सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहे. मात्र आज पहिल्यांदा मला आयुष्यात एक आदर्श नागरिक या नात्याने पुरस्कार मिळाला आहे. या देशासाठी, या सरकारसाठी मी माझे आभार व्यक्त करते. जेव्हा मी माझे करियर सुरू केले लहान वयात तेव्हा मला यश मिळाले नाही. साधारण ८/१० वर्षांनी मला यश मिळाले. पण मी त्या यशाचा आस्वाद न घेता त्या गोष्टी केल्या ज्यामुळे मी पैशांपेक्षा अधिक शत्रू तयार केले. ज्यात मी अनेक फेयरनेस प्रोडक्ट्सच्या जाहिरातींना नकार दिला, आयटम नंबर्सला नकार दिला मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्यास नकार दिला.”
पुढे कंगना म्हणाली, “जेव्हा जास्त समाज आली तेव्हा देशाविषयी, देशाला तोडणाऱ्या शक्ती मग जिहादी असो, खलिस्तानी असो किंवा शत्रू राष्ट्र असो याविरोधात मी आवाज उठवला. आज माझ्याविरोधात अगणित केसेस चालू आहेत. लोकं अनेकदा मला विचारतात, काय मिळते तुला असे करून?, का करते तू हे सर्व?, हे आपले काम नाही? असे प्रश्न विचारणाऱ्या त्या सर्व लोकांचे मला मिळालेला हा पदमश्री पुरस्कार नक्कीच तोंड बंद करेल. मी मनापासून या देशाचे आभार व्यक्त करते जय हिंद.”
देशातील चौथा सर्वोच्च सन्मान असणाऱ्या पदमश्री पुरस्काराने कंगनासोबतच अदनान सामी, एकता कपूर, करण जोहर आदी मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला. तर प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-