Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड ‘वस्तू विकण्यासाठी धर्माचा वापर करू नका’, म्हणत कंगनाने आलियाला ‘कन्यादान’ जाहिरातीवरून फटकारले

‘वस्तू विकण्यासाठी धर्माचा वापर करू नका’, म्हणत कंगनाने आलियाला ‘कन्यादान’ जाहिरातीवरून फटकारले

मनोरंजन विश्वात कलाकार त्यांच्या कलाकृतीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम देखील करत असतात करमणूकसोबतच समजला विविध गोष्टींमध्ये जागृत केले जाते. मात्र कधी कधी हे समाजप्रबोधन करताना आधुनिकतेच्या नावाखाली काही अशा गोष्टी दाखवल्या ज्या दाखवायला नको. मग यामध्ये आपल्या रूढी, परंपरा, सणवार, चालीरीती आदी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. समाजातील काही लोकं या गोष्टींबाबत खूपच संवेदनशील असतात. त्यांना या बाबींबाबत कोणतीही तडजोड आवडत नाही, आणि जेव्हा असे दाखवणाऱ्या कलाकृती समोर येतात तेव्हा वादाला सुरुवात होते.

असेच काहीसे घडले आहे आलिया भट्टच्या बाबतीत. नुकतीच आलियाची ‘मान्यवर’ची ‘मोहे’ जाहिरात समोर आली आणि वादाला तोंड फुटले. या जाहिरातीमधून ‘कन्यादान’ या सर्वात मोठ्या हिंदू लग्नातील विधीवर भाष्य करण्यात आले आहे. जाहिरातीत आलिया ‘कन्यादान कन्यामान’ असे बोलताना दिसत आहे. त्यामुळेच आता या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात टीका होता आहे. याबाबत सोशल मीडियावर सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वच त्यांची मतं मांडताना दिसत आहे. बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने देखील या जाहिरातीचा विरोध करताना सोशल मीडियावर एका पोस्ट लिहिली आहे.

कंगनाने आलियाला टॅग करत तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “सर्व ब्रँड्सला विनम्र निवेदन आहे. धर्म, अल्पसंख्याक, बहूसंख्यांक, राजकारण आदी गोष्टींना वस्तू विकण्यासाठी वापरू नका. विभाजनकारी जाहिरातींसोबत ग्राहकांना डिवचने बंद करा.”

कंगनाने तिच्या लांबलचक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आपण टीव्हीवर नेहमी बघतो, जेव्हा देशाचे रक्षण करताना एखादा जवान शाहिद झाला तर त्याचे वडील मोठ्या आवाजात अभिमानाने सांगतात की, काही हरकत नाही. माझा अजून एका मुलगा आहे, त्याला मी भारत मातेसाठी दान करेन. कन्यादान असो किंवा पुत्रदान, समाज आपल्या त्यागाच्या वृत्तीकडे ज्या यापद्धतीने बघतो, त्यावरूनच त्यांच्या मान्यतांबद्दल समजते. जेव्हा सर्वच दानधर्माची संकल्पना नीच पातळीवर ठेवण्यास सुरुवात करतील तेव्हा या रामराज्याच्या जीर्णोद्धाराची वेळ आली आहे, असे समजा. एका राजा जो सर्व गोष्टींचा त्याग करून त्याचे जीवन व्यतीत करत होता. हिंदू धर्माची आणि त्यात असणाऱ्या चालीरितींची मस्करी करणे थांबवा. पृथ्वी आणि स्त्री दोघांनाही शास्त्रात आई म्हटले जाते. त्यांची पूजा केली जाते, त्यांना एक मौल्यवान मालमत्ता आणि अस्तित्वाचे केंद्र मानण्यात काहीच नुकसान नाही.(शक्ती)”

https://www.instagram.com/p/CT7Ik5aAuzl/?utm_source=ig_web_copy_link

आलिया भट्टच्या या जाहिरातीचा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून या व्हिडीओला अनेक लाईक्स आणि अनेक कमेंटस येत आहे. तर काहींना हा व्हिडीओ अजिबात आवडलेला नाही. अनेकजण या जाहिरातीमुळे आलियाला ट्रोलसुद्धा करत आहे. आलिया भट्टने आणि मान्यवरने हिंदू धर्माचा अवमान केला असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर

-‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू

हे देखील वाचा