Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड ‘थलायवी’ चित्रपटावरून शांत असणाऱ्या बॉलिवूडला कंगना रानौतने सुनावले, म्हणाली ‘मानवीय भावनांच्या…’

‘थलायवी’ चित्रपटावरून शांत असणाऱ्या बॉलिवूडला कंगना रानौतने सुनावले, म्हणाली ‘मानवीय भावनांच्या…’

कंगना रानौत ही नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. कंगनाचे स्पष्ट आणि बिनधास्त बोलणे नेहमीच तिला वादांमध्ये अडकवत असते. तरीही कंगना काही तिचे बोलणे बंद करत नाही. ती सतत तिला खटकणाऱ्या आणि चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल तिचे मत मांडत आहे. नुकताच तिचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘थलायवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात तिने तामिळनाडूच्या दिवंगत आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका निभावली आहे.

हा सिनेमा चित्रपटगृहांसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या सिनेमातील तिचा अभिनय, चित्रपटाची कथा सर्वच लोकांना खूप भावली. समीक्षकांनी देखील चित्रपटाचे आणि कंगनाची अभिनयाचे कौतुक केले. कंगनाने देखील सर्वांचे आभार मानले आहे. एकीकडे प्रेक्षक आणि समीक्षक तिचे कौतुक करत असताना बॉलिवूडमधून कोणीही या चित्रपटाबद्दल एक अवाक्षर देखील काढले नाही. याचा कंगनाला राग आला असून, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा रोष व्यक्त केला आहे.

कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिले आहे, ज्यात तिने म्हटले आहे की, “असे खूप कमी चित्रपट असतात ज्यांना खूप प्रेम आणि सन्मान मिळतो. ‘थलायवी’ हा असाच एक सिनेमा आहे. मला खूप आनंद आहे, की या सिनेमातून लोकांना जयललिता यांच्याबद्दल अधिक माहिती मिळत आहे. मी चित्रपटाच्या टीमचे मनापासून आभार मानते की, त्यांनी चित्रपटसृष्टीला ‘थलायवी’च्या रूपाने एक उत्तम चित्रपट दिला आहे.”

पुढे तिने बॉलिवूडवर प्रश्न निर्माण करत लिहिले, “सोबतच मी सिनेसृष्टीतील बॉलिवूड माफियांची वाट बघत आहे, जे त्यांच्या राजनीतिक विचारांना बाजूला करत एखाद्या कलाकृतीचे कौतुक करतील. मी सुद्धा कोणाचे कौतुक करताना मागे सरत नाही. तुमच्या मानवीय भावनांच्या वर उठून एखाद्या कलाकृतीला जिंकू द्या.”

‘थलायवी’ चित्रपटाचे दिग्दर्शन ए एल विजय यांनी केले असून, केवी विजेयेंद्र प्रसाद, माधन कार्के आणि रजत अरोरा यांनी हा सिनेमा लिहिला आहे. या चित्रपटात एमजेआर आणि जयललिता यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

 

हे देखील वाचा