सुशांत सिंह राजपूत प्रकरणापासून कंगना रनौत ने जवळजवळ देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. सरकार विरोधात ज्या काही घटना घडत आहेत त्या सर्व घटनांविरुद्ध कंगना ट्विटरवरून तीचं मत व्यक्त करत असते. तिच्या या मतांमुळे अनेक वाद निर्माण होत असतात हे ही काही वेगळं सांगायला नको.
सध्याच्या घडीला दिल्ली सीमेवर जे पंजाबी शेतकऱ्यांचं केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात जे आंदोलन सुरू आहे त्यावर सुद्धा कंगना व्यक्त झाली. सुरुवातीला तिने एका आंदोलनकर्त्या आजींवर १०० रुपये भाड्याने आंदोलनात उपस्थित राहिल्याची टीका केली होती. तिच्या या विधानानंतर बरेच वाद विवाद झाले होते. अभिनेता दिलजीत दोसंज ने तिच्यावर कडक शब्दांत टीका केली होती. यानंतर कंगना मधला काही काळ शांत झालेली दिसली परंतु आता तिने पुन्हा एक व्हिडिओ ट्विटर मार्फत प्रसिद्ध केला आहे. ज्यात तिने आंदोलकांवर तसेच दिलजीत दोसंज आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर देखील टीका केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने शनिवारी सोशल मीडियावर सांगितले की तिला बलात्कार आणि जीवघेण्या धमक्या मिळत आहे. दिल्लीचं शेतकरी आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं ती म्हणाली सोबतच तिने आणखीन एक वक्तव्य केलं की, ‘शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यामुळे मला गेल्या १०-१२ दिवसांपासून भावनिक आणि मानसिक ऑनलाईन लिंचिंगचा सामना करावा लागला आहे.’ शिवाय तिच्या या व्हिडियोमधून तिने शेतकरी आंदोलनामध्ये दहशतवादी देखील सहभागी असल्याचं सांगितलं आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1340190483117531136?s=19
अभिनेता दिलजीत दोसंज ने काही दिवसांपूर्वी कंगनाची मिमिक्री करत तिची खिल्ली उडवली होती. कंगना ला माझं नाव घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवातच करता येत नाही. ती माझ्या नावाचा वापर डॉक्टरांच्या औषधासारखा करते, असं सांगत तिच्या आरोपांना उत्तर दिलं होतं. शिवाय कंगनाच्या या टिवटीवीला कंटाळून अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील तिच्यावर टीका केली होती. यामुळे कंगना ने स्वतःला देश भक्त सांगत या दोघांवरही टीकेचा भडिमार केला. तिच्या व्हिडिओमधून दिलजीत आणि प्रियांका हे कोणत्या नीतीचा वापर करत आहेत हे त्यांना विचारण्याचं अपील कंगनाने तिच्या फॉलोअर्स ना केलं. आता या सगळ्यावर शेतकरी आंदोलक तसेच अभिनेता दिलजीत दोसंज आणि अभिनेत्री प्रियांका काय प्रतिक्रिया देतात या कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.