Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित ‘धाकड’ सिनेमाचा टिझर अखेर प्रदर्शित, पंगा क्वीनचा ऍक्शन अवतार बनला चर्चेचा विषय

कंगना रणौतच्या बहुप्रतिक्षित ‘धाकड’ सिनेमाचा टिझर अखेर प्रदर्शित, पंगा क्वीनचा ऍक्शन अवतार बनला चर्चेचा विषय

बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या आणि विविध वादांमध्ये सतत अडकणाऱ्या कंगना रणौतच्या आगामी ‘धाकड’ (Dhaakad) सिनेमाचा दमदार टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. कंगनाचा हा सिनेमा सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे सतत प्रकाशझोतात राहत आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आणि कंगनाची फॅन्सची या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. ‘धाकड’ या सिनेमाची सर्वाना खूपच उत्सुकता असून सध्या या सिनेमाच्या टीझरची चांगलीच चर्चा रंगली आहे.

‘धाकड’ या सिनेमाच्या टीझरमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या असणाऱ्या उत्सुकतेला अधिकच ताणले जाणार आहे हे नक्कीच. सिनेमातच्या टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. या सिनेमाच्या १ मिनिट २० सेकंदाच्या टीझरमध्ये फक्त आणि फक्त कंगनाने संपूर्ण स्क्रीन घेतली आहे. टीझरच्या सुरुवातील काळ्या रंगाची बिकिनी घालून ड्रिंक करताना दिसते आणि नंतर बाथटबमधे असताना तिला एक फोन येतो आणि ती तिच्या दमदार ऍक्शनसाठी तयार होते. त्यानंतर ती तिच्या शत्रुंना मारताना दिसते.

या टीझरमध्ये कंगनाची विविध रूपं प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात कंगना एका गुप्तहेरांच्या भूमिकेत दिसणार असल्याने आणि पहिल्यांदाच तिला ऍक्शन करताना पाहता येणार असल्याने हा सिनेमा विशेष समजला जात आहे. टिझर पाहूनच लक्षात येते की, सिनेमात ऍक्शन, थ्रिल, स्टाईल, कंगनाचा प्रतिभावान अभिनय सर्वच कमालीचा असणार आहे. या टीझरमध्ये कंगनासोडून इतर कलाकरांना दाखवण्यात आले नाहीये.

हा सिनेमा आधी २७ मे २०२२ ला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा एक आठवडा आधीच अर्थात २० मे ला प्रदर्शित केला जाणार आहे. कंगनाने तिच्या या ‘धाकड’ सिनेमाचा टिझर इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील शेअर केला आहे. या चित्रपटात कंगनासोबतच अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता दिसणार असून, एका माहितीनुसार अर्जुन चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याच्या लूकने देखील तुफान चर्चा मिळवली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा