Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘धाकड’नंतर कंगना पुढच्या मिशनसाठी झाली सज्ज; आगामी चित्रपटासाठी वायुदलाच्या गणवेशात दिसली अभिनेत्री

‘धाकड’नंतर कंगना पुढच्या मिशनसाठी झाली सज्ज; आगामी चित्रपटासाठी वायुदलाच्या गणवेशात दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत एकापाठोपाठ एक तिच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण करत आहे आणि त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अलीकडेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून कंगनाने सांगितले की, तिने ‘तेजस’चे शूटिंग सुरू केले आहे. फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, “आता मी माझ्या पुढच्या मिशनवर… आजपासून सुरुवात होत आहे. माझ्यातील जोश वाढत आहे आणि याचे कारण आहे माझी शानदार टीम.”

पहिल्यांदाच वर्दीमध्ये दिसली अभिनेत्री
या फोटोत कंगना वर्दीमध्ये दिसत असून, ती खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रपटात ती भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने याआधी अनेक वेगवेगळी पात्रे साकारली आहेत. पण यावेळी पहिल्यांदा ती वर्दीमध्ये दिसली आहे. या चित्रपटाची कथा भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना समर्पित आहे.

प्रसिद्ध निर्माता रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. तसेच सर्वेश मेवाडा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, पहिली झलक दाखवत कंगनाने सांगितले होते की ती या चित्रपटाचा भाग बनणार आहे. चित्रपटाच्या नाव आणि पोस्टरवरून हे देखील लक्षात येते की, हा चित्रपट केवळ हवाई दलाच्या शूर वैमानिकांची कथा नाही, तर भारताच्या एकमेव स्वदेशी प्रगत लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजसची कहाणी आहे.

याआधी कंगनाने ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. कंगना देखील या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. ‘धाकड’चे शूटिंग संपल्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. मात्र काही युजर्सने तिच्या या बोल्ड फोटोंसाठी तिला जोरदार ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा