Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

कंगना रणौत ही तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिच्या वैयक्तिक कारणांमुळे आणि खासकरून तिच्या वादांमुळे जास्त चर्चेत असते. अनेकांसोबत ‘पंगा’ घेणारी कंगना आणि तापसी यांचा मागील काही काळापासून जोरदार शाब्दिक वाद सुरु आहे. तापसीने रशियामधले साडी आणि शूज घातलेले फोटो पोस्ट केल्यानंतर कंगनाने तिच्यावर टीका केली होती. तापसीला कंगनाने ‘सस्ती कॉपी’ म्हटले होते, यावर तापसीने कंगनाला डबल फिल्टरचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.

कंगनाचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्यानंतर, ती आता इंस्टाग्रामवर सक्रिय झाली आहे. नुकतेच तापसीने तिचे एक स्टेटमेंट दिले आहे. एका मुलाखतीदरम्यान तापसीला विचारले गेले की, कंगनाला ट्विटरवर बंदी घातल्यानंतर तू तिला ट्विटरवर मिस करते का? या प्रश्नावर उत्तर देताना तापसी म्हणाली, “नाही, मला तिची आठवण येत नाही आणि तिला पुन्हा एकदा तिथे पाहण्याची माझी इच्छा देखील नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्यात तिला काही महत्व नाही. ती माझ्यासाठी फक्त एक कलाकार आणि सहकारी आहे. पण यापेक्षा माझ्या आयुष्यात तिला जास्त महत्व नाही. मला तिच्याबद्दल चांगली किंवा वाईट अशी कोणतीच भावना नाही. जर तुम्हाला कोणी आवडतच नसेल, तर ते आपल्या मनापासून येतं. परंतु यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला त्याचा फरक पडत नाही. जे आहे ते आहे, मला काही फरक पडत नाही.” असे तापसी म्हणाली.

तापसीच्या या वक्तव्यावर कंगनाने तिचे मत मांडताना इंस्टाग्रामवर लिहिले, ” तापसी निर्मात्यांना फोन करून चित्रपटांसाठी भीक मागायची. त्यांना सांगायची कंगनाने काही सोडले असले तर प्लिज मला द्या आणि आज हिची लायकी बघा. जिला कधी काळी गरीब निर्मात्यांनी कंगना म्हटल्यावर अभिमान वाटायचा. असो तुला तुझ्या आगामी चित्रपटांसाठी शुभेच्छा.” सोबतच कंगनाने लिहिले की, तापसीने कंगनाचे नाव न घेता तिचे सिनेमे प्रमोट केले पाहिजे.

 

लवकरच तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीझ होणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच ती ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठु’, ‘लूप लपेटा’, ‘दोबार’ आणि ‘वो लडकी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे कंगना ‘थलाइवी’, ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; कलाकारांनी व्यक्त केला शोक

-‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

-‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

हे देखील वाचा