सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) रियॅलिटी शो ‘लॉक अप’ होस्ट करताना दिसत आहे. या शोमध्ये स्पर्धक आपली गुपिते उघडताना दिसत आहेत. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या शोमध्ये कंगना रणौत विवाहित पुरुषांना पसंत केल्याबद्दल सांगताना दिसली. तिने ऋतिक रोशनचे (Hrithik Roshan) नाव न घेता तिचा विवाहित पुरुषाला पसंत केल्याचा अनुभव सांगितला.
शो दरम्यान कंगनाने मुनव्वर फारुकीचा एक फोटो सर्वांना दाखवला आणि विचारले की त्याला याबद्दल काही बोलायचे आहे का? कंगनाने सांगितले की, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मुनव्वर एक महिला आणि एका मुलासोबत पोझ देताना दिसत आहे. तेव्ह मूनव्वर म्हणतो की, “यावर मला बोलायचे नाही. ना सोशल मीडियावर ना लॉकअपमध्ये. मला फक्त याबद्दल बोलायचेच नाही.” (kangana ranaut talk about hrithik roshan without taking his name)
कंगना पुढे म्हणाली की, “प्रत्येक मुलगी विवाहित पुरुषाच्या आकर्षणाने प्रभावित होते. मी माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगत आहे. मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये, पण असे होते कारण विवाहित पुरुष जास्त समजूतदार असतात. ते जबाबदार असतात, जे तरुण मुलींना प्रभावित करते.”
दरम्यान कंगनाचा हा शो मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. प्रेक्षक यातील प्रत्येक कैद्याला भरभरून प्रेम देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा