बॉलिवूडची पंगा क्वीन कंगना रणौत आपल्या रोखठोक वक्तव्यामुळे सतत चर्चेचा विषय ठरत असते. अलीकडेच ती आर्यन खान प्रकरणावर तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे पुहा एकदा चर्चेत आली आहे. कंगना रणौतने आर्यन खान प्रकरणावर भाष्य करताना अभिनेता शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच स्पष्ट प्रतिक्रियेमुळे चर्चेत राहिलेल्या कंगनाने सोशल मीडियावर शाहरुख खानवर निशाणा साधत एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जॅकी चॅन आपल्या मुलाच्या अटकेनंतर माफी मागताना दिसत आहे. फोटोमध्ये एका बाजूला जॅकी चॅन आणि त्याचा मुलगा आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कंगनाने तिच्या पोस्टद्वारे शाहरुख खानवर साधला निशाणा
फोटोमध्ये असे लिहिले आहे, “जॅकी चॅनने २०१४ मध्ये त्याच्या मुलाला अं’मली पदार्थ प्रकरणात अटक केल्यावर अधिकृतपणे माफी मागितली होती!” ते म्हणाले की, “मला माझ्या मुलाच्या कृत्याची लाज वाटते, हे माझे अपयश आहे आणि मी त्याच्या संरक्षणासाठी हस्तक्षेप करणार नाही आणि त्यानंतर त्याचा मुलगा ६ महिने तुरुंगात राहिला होता.” ही पोस्ट शेअर करताना कंगनाने लिहिले की, “फक्त सांगत आहे.”
यापूर्वीही कंगनाने या प्रकरणावर केले होते भाष्य
यापूर्वीही, कंगनाने सुरू असलेल्या अं’मली पदार्थ प्रकरणावर एक मोठी पोस्ट लिहिली होती, जेव्हा ऋतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आर्यन खानला पाठिंबा दिला होता. तेव्हा तिने लिहिले होते की, “आता सर्व माफिया पप्पू आर्यन खानच्या बचावासाठी येत आहेत. आपण चुका करतो पण आपण त्यांचा गौरव करू नये. मला खात्री आहे की, यामुळे त्याला एक दृष्टीकोन मिळेल आणि त्याला त्याच्या कृतीचा परिणाम जाणवेल. आशा आहे की, हे त्याला विकसित आणि मोठा बनवेल. हे खरे आहे की, जेव्हा तो अडचणीत असतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल गॉसिप करू नये, परंतु ही एक गुन्हेगारी आहे की, आपण त्याला त्याने जे केले ते चुकीचे नव्हते हे जाणीव करून देऊ.”
एनसीबीला पार्टीच्या तीन दिवस आधी मिळाली माहिती
हशीश, एमडी, एनसीबीने केलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकेन सापडले होते. एनसीबीला या अं’मली पदार्थ पार्टीची माहिती मिळाली. या पार्टीत सामील होण्यासाठी ८० हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत पैसे आकारण्यात आल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे, एनसीबीचे काही अधिकारी पार्टीत सामील होण्याच्या बहाण्याने क्रूझमध्ये दाखल झाले. आतील दृश्य पाहिल्यानंतर या टीमने बाहेर बसलेल्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर एनसीबीच्या टीमने शनिवारी २ ऑक्टोबर रोजी रात्री छापा टाकत अनेकांना अटक केली. यातच शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा देखील समावेश आहे. सध्या आर्यनला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे