Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड ‘कर्माचे फळ भोगावे लागते’ म्हणत, स्वतःच्या देशात लपवून बसणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांवर कंगनाची टीका

‘कर्माचे फळ भोगावे लागते’ म्हणत, स्वतःच्या देशात लपवून बसणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांवर कंगनाची टीका

बॉलिवूडची पंगा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली कंगना रानौत (Kangana Ranaut) नेहमीच प्रत्येक मुद्द्यावर तिचे मत बिनधास्त मांडताना दिसते. मग तो मुद्दा राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच बेधडक वक्तव्य करत असते. आता कंगनाने पुन्हा एकदा तिचे शब्दांचे वार केले आहे. यावेळेस तिच्या निशाण्यावर आहेत कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau).

कॅनडामध्ये ट्रक ड्रायव्हर यांनी लसीचे जनादेश, मास्क आणि लॉकडाऊन यांचा विरोध केला आहे. यावर तिने तिचे मत देताना त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. जस्टिन ट्रूडो हे त्यांच्या परिवारासोबत एका गुप्त ठिकाणी आहे. यावर कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “कर्माचे फळ भोगावे लागते.” २०२० साली भारत सरकारच्या विरोधात शेतकरी जे आंदोलन करत होते त्याला जस्टिन ट्रूडो यांनी समर्थन दिले होते. यावरच कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

Photo Courtesy Instagramkanganaranaut

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतीय प्रदर्शनकर्त्यांना प्रोत्साहन देत होते, आणि आता स्वतःच्या देशात गुप्त स्थानावर लावून लपत आहेत. कारण काय तर प्रदर्शनकारी लोकांमुळे त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते.”

शेतकऱ्यांचे सरकार विरोधात जेव्हा आंदोलन सुरु होते तेव्हा जस्टिन ट्रूडो यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना म्हटले होते, “जर मी शेतकऱ्यांच्या आंदोलांबद्दल भारतातून येणाऱ्या बातम्यांवर व्यक्त झालो नाही तर मला त्याचे खूप दुःख होईल. परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. आम्ही त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसाठी चिंतीत आहोत. आम्हाला माहित आहे की, तुमच्यापैकी अनेकांसाठी ही वास्तविकता आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, शांततेत आंदोलन करणाऱ्या सर्व प्रदर्शनकारींच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी कॅनडा नेहमीच उभा असेल. आम्ही चर्चेवर विश्वास ठेवतो.” जस्टिन ट्रूडो सरकारने अमेरिकेची सीमा पार करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर्सला लस घेणे बंधनकारक केले. याचाच विरोध या ड्रायव्हर्सने करत या नियमांची तुलना फासीवादासोबत केली आहे.

Photo Courtesy Instagramkanganaranaut justinpjtrudeau

कंगना लवकरच तिच्या आगामी ‘तेजस’, ‘इमरजेंसी’ आणि ‘धाकड’ सिनेमात दिसणार असून, तिच्या प्रॉडक्शनच्या अंतर्गत ‘टीकू वेड्स शेरू’ बनत असल्याने ती या सिनेमातही व्यस्त आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा