विद्या बालनला मुख्य भूमिका मिळण्यापुर्वी ‘या’ अभिनेत्रीने नाकारला होता ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमा, आज म्हणतेय…


बॉलीवूड मधील धाकड गर्ल कंगना रणौत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच बॉलिवूडमध्ये आणि आता राजकारणात देखील सर्वत्र चर्चेत असते. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला सर्वत्र ट्रोल केले जाते. प्रत्येक वेळी कंगनाने बॉलीवूडपासून ते अगदी भारताच्या राजकारणात अनेक वेगवेगळे प्रश्न उठवले आहेत. प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अडचणीमध्ये तिने तिचे विचार देखील मांडले आहेत. त्यामुळे तिला नेहमीच ट्रोलींगचा सामना करावा लागला आहे. आता देखील ती तिच्या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चेत आहे. खर तर कंगनाने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. यामध्ये अजुन एका चित्रपटाची भर पडली असती पण तिने त्या चित्रपटाला नकार दिला. तो चित्रपट म्हणजे ‘द डर्टी पिक्चर.’

2011 मध्ये प्रदर्शित झालेला द डर्टी पिक्चर हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री विद्या बालन होती. परंतु विद्या बालनच्या आधी कंगना रणौतला या चित्रपटाची ऑफर आली होती. परंतु तेव्हा तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले होते की, हा चित्रपट नाकारल्याचा तिला अजिबात पश्चाताप होत नाहीये.

कंगना रणौतने नुकतेच काही दिवसांपूर्वी टाईम्स ऑफ इंडिया सोबत बोलताना याबद्दल सांगितले होते की, याआधी देखील मी कित्येक वेळा सांगितले आहे की, “द दर्टी पिक्चर हा एका कमाल चित्रपट आहे. पण मला असे नाही वाटत की, मी या चित्रपटात विद्या बालनपेक्षा चांगला अभिनय करू शकले नसते. विद्या बालनने कमालीचा अभिनय केला आहे. परंतु मला अनेक वेळा असे वाटते की, मी या चित्रपटात एवढे पोटेंशिअल पाहिले नव्हते.”

कंगनाने पुढे सांगितले की,” मी कधीही राज कुमार हिरानी, संजय लीला भन्साळी आणि अगदी धर्मा प्रोडक्शनच्या पारंपरिक चित्रपटात काम केले नाही. ना वायआरएफ सोबत काम केले ना कोणत्या खान सोबत काम केले. तरीही आज मी टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्यांनी त्यांच्या स्वतःच्या बळावर त्यांचे नाव कमावले आहे. पण मला डर्टी पिक्चरमध्ये कोणतीही नवीन संधी दिसत नव्हती. त्यामुळे मी हा चित्रपट नाकारला होता.”


Leave A Reply

Your email address will not be published.