कलाकार त्यांच्या चित्रपट आणि फोटोशूट यांच्यासोबतच अजून एका गोष्टीसाठी खूप जास्त चर्चेत असता आणि ती गोष्ट म्हणजे कलाकारांचे मानधन. कलाकार त्यांच्या चित्रपटांसाठी बक्कळ मानधन घेतात. जितका मोठा कलाकार, जितका यशस्वी कलाकार तितकेच त्याचे मानधन जास्त. कलाकार नेहमीच त्यांना मिळणाऱ्या यशानुरूप त्यांच्या मानधनात वाढ करत असतात. चित्रपटांइतकेच किंबहुना चित्रपटांपेक्षा अधिक मानधनामुळे ते प्रकाशझोतात येतात. आजच्या घडीला बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून कंगना रानौत ओळखली जाते.
नेहमीच आपल्या खळबळजनक वक्त्यांमुळे आणि आरोपांमुळे चर्चेत असणारी कंगना यावेळी मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे लाइमलाईट्मधे आली आहे. सगळ्यांचं माहित आहे की, लवकरच कंगना ‘द इनक्रेनेशन: सीता’ सिनेमात दिसणार आहे. आधी करीना कपूरला ऑफर झालेला हा सिनेमा बऱ्याच समस्यानंतर कंगना रानौतच्या झोळीत येऊन पडला. कंगना ‘सीता’ साकारणार ह्या बातम्या येत असतानाच आता एक नवीन बातमी येत आहे.
कंगना या सिनेमासाठी तब्बल ३२ कोटी रुपये घेणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि यूटुबर असणाऱ्या केआरके सोशल मीडियावर हा दावा केला आहे. जर हा दावा खरा असेल तर कंगना बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री ठरेल. मात्र याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाहीये.
याआधी ही भूमिका करीना कपूरला ऑफर केली होती. तिला या सिनेमासाठी १२ कोटी रुपये मिळणार होते, मात्र करीनाला सिनेमात घेण्यावरून खूपच गोंधळ झाला होता. या चित्रपटाचे लेखक असणाऱ्या मनोज मुतंशिर यांनी सांगितले की, “या भूमिकेसाठी कंगनाच माझी पहिली पसंती होती. आम्ही कधीच कोणत्याच दुसऱ्या अभिनेत्रीशी संपर्क नाही केला. कारण आम्हाला पहिल्यापासूनच या सिनेमात कंगनाच पाहिजे होती. या सिनेमात सीता देवींचे चरित्र ज्या पद्धतीने रंगवले गेले आहे, त्याला कंगनाच योग्य न्याय देऊ शकते. ”
‘द इनक्रेनेशन: सीता’ हा सिनेमा अलौकिक देसाई दिग्दर्शित करणार असून, ‘बाहुबली’ फेम एसएस राजामौली यांचे वडील असणाऱ्या केवी विजेंद्र प्रसाद यांनी हा सिनेमा लिहिला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-साधना शिवदासानी जगल्या ‘अशा’ प्रकारचे जीवन, ‘या’ कारणास्तव ठोकला होता अभिनयक्षेत्राला राम राम!