अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेक विषयांवर ती आपले मत व्यक्त करत असते, ज्यामुळे तिला बर्याचदा टीकेचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही ती वादग्रस्त वक्तव्य करतच असते. आता तिच्याबद्दल नवीनच माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये ती लॉकअपमध्ये असल्याचे समजत आहे. आता हा लॉकअप प्रकार काय आहे? चला जाणून घेऊ.
कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या चित्रपटांपेक्षा इतर बाबींमुळेच नेहमी चर्चेत असते. आता अशीच तिच्या नवीन कार्यक्रमाची होत आहे. आपल्या कारकीर्दीची सुरुवात एकता कपूरच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटातून करणार्या कंगनाची डिजिटल फ्लॅटफॉर्मवरही तिच्याच कार्यक्रमातून एन्ट्री होणार आहे. याच्या घोषणेचा मोठा कार्यक्रम गुरुवारी (०३ फेब्रुवारी) पार पडणार आहे. निमंत्रण पत्रिकेत जरी या कार्यक्रमाचे आणि सूत्र संचालकांचे नाव दिले नसले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार या ‘लॉकअप’ असे या कार्यक्रमाचे नाव असून याचे समालोचन कंगना रणौत करणार आहे.
नुकताच एकता कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने या नव्या कार्यक्रमाच्या संबंधित चर्चा केली होती. या कार्यक्रमात गाणी, डान्स अशा प्रकारचा काहीही संबंध नसेल, असेही तिने स्पष्ट केले होते. मात्र, या कार्यक्रमाचे नाव तिने यावेळी सांगितले नव्हते. आता सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे नाव ‘लॉकअप’ असून अभिनेत्री कंगना रणौत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या नव्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री कंगना रणौत खूपच उत्साही आहे. तिने याबद्दल एक पोस्टही सोशल मीडियावर केली होती. मात्र, तिने लगेच ती डिलीट केली. या कार्यक्रमाचे प्रसारण एकता कपूरच्या अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयरवर होणार आहे.
हेही पाहा- ‘बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule
या कार्यक्रमात अनेक नामांकित कलाकारांना एका निर्जन स्थळी सोडले जाईल. त्या ठिकाणी त्यांना अनेक आव्हाने दिली जातील. यावेळी इथे अशा प्रकाराच्या वातावरणाची निर्मिती केली जाईल की, या सहभागी कलाकारांकडून चुकीचे वर्तन किंवा अश्लील प्रकार घडेल. मात्र, यावर कार्यक्रमाची मुख्य म्हणून कंगनाची करडी नजर असेल. दरम्यान हा सगळा कार्यक्रम म्हणजे अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरने आपल्या भडक आणि अश्लील मालिकांमुळे बिघडलेल्या प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता ही बिघडलेली प्रतिमा सुधारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण या कार्यक्रमांची निर्माती एकता कपूरने हा कार्यक्रम पाहणार्याने आपल्या जबाबदारीवर पाहण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा-