Monday, June 17, 2024

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर कोरोनाचे सावट, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा घेतला बळी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुःखाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे कन्नड चित्रपट निर्माता प्रदीप राज याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याने गुरुवारी (२० जानेवारी) रोजी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्याच्यामागे त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि दोन मुले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार त्याचे अंत्यसंस्कार पुडूचेरीमध्ये होणार आहे.

प्रदीप राजने ‘गिरगिटले, ‘कुच्छू’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटात काम केले आहे. त्याचा ‘गिरगिटले’ हा शेवटचा चित्रपट आहे. त्यांनी केजीएफ स्टार यशच्या ‘किरातका’ या चित्रपटाचे देखील दिग्दर्शन केले आहे. (Kannad filmmaker pradeep Raj passed away)

प्रदीप राजच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे. तो खूप मेहनत खूप आज एक यशस्वी दिग्दर्शक बनला होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. सोशल मीडियावर अनेक कलाकार त्याचे फोटो शेअर करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेता महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबूचा मृत्यू झाला. तेव्हा त्याने सोशल मीडियावर त्याच्या भावाच्या मृत्यूची बातमी दिली होती. रमेश बाबू मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांचा लिव्हर खराब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

Shaheer Sheikh | महाभारतातील ‘अर्जूनावर’ कोसळला दुःखाचा डोंगर! मायेचा, आधाराचा हात कायमचा हरपला

बॉलिवूडमधील ‘या’ अभिनेत्यांनी गे रोलमध्ये उतरण्यासाठी पडद्यावर दिले किसिंग सीन, अभिषेक बच्चनचा देखील आहे समावेश

अखेर शाहरुख खानला मध्यस्थी करून मिटवावे लागले होते करिष्मा आणि माधुरीचे भांडण, हे होते वादाचे कारण

 

हे देखील वाचा