Sunday, February 1, 2026
Home साऊथ सिनेमा तुझ्या कामाला सलाम! कोरोना रुग्णांसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार बनला ऍम्बुलन्स ड्रायव्हर, पीपीई किट घालून मृतांना पोहोचवतोय स्मशानात

तुझ्या कामाला सलाम! कोरोना रुग्णांसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार बनला ऍम्बुलन्स ड्रायव्हर, पीपीई किट घालून मृतांना पोहोचवतोय स्मशानात

मागील वर्षीपासून भारतात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसची आता दुसरी लाटही आली आहे. या व्हायरसने सर्वसामान्य व्यक्तींपासून बड्या दिग्गज कलाकार मंडळींपर्यंत सर्वांनाच आपल्या तावडीत घेतले आहे. परंतु सोनू सूद सारखे अनेक कलाकार आहेत, जे सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सर्वजण आपापल्या परीने मदत करताना दिसत आहेत. यामध्ये कन्नड सुपरस्टार अर्जुन गौडा याचाही समावेश आहे. पीपीई किट घालून अर्जुन कोरोना वॉरिअर बनला आहे. तो नागरिकांच्या मदतीसाठी चक्क रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनला आहे आणि रुग्णांना रुग्णालयात पोहोचवताना दिसत आहे.

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींना स्मशानभूमीपर्यंत नेण्यापासून ते त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंत अभिनेता सर्व गोष्टी करताना दिसत आहे.

डझनपेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांवर केले अंत्यसंस्कार
महामारीच्या या कठीण काळाबद्दल अर्जुनने सांगितले की, ‘मागील काही दिवसांमध्ये मी जवळपास डझनपेक्षा अधिक कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केला आहेत. ज्याला मदतीची आवश्यकता आहे, त्याला मदत करणेच माझी प्राथमिकता आहे. मी जात, धर्म अशा कोणत्याही गोष्टी न पाहता गरजूंना मदत करत आहे.’ यासाठी त्याने स्वत: एक रुग्णवाहिका घेतली आहे आणि रुग्णांना रुग्णालयात पोहोचवत आहे.

गरजूंना देत आहे ऑक्सिजन
अर्जुनने पुढे सांगितले की, ‘नुकतेच त्याने एका व्यक्तीला दूरच्या एका रुग्णालयात पोहोचवले. तो पुढेही गरजूंना मदत करत राहील. येत्या काही महिन्यात मी आपल्या चित्रपटांऐवजी कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात घेऊन येईल.’ त्याने म्हटले की, ‘ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे किंवा इतर कोणतीही मदत हवी असेल, ते थेट माझ्याशी संपर्क साधू शकतात. या कठीण परिस्थितीत मी सर्वांसोबत आहे.’

अर्जुनने केले या चित्रपटात काम
अर्जुनने ‘युवरथना’, ‘ओडेया’, ‘रस्टम’ आणि ‘आ दृश्य’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटसृष्टीवर दु: खाचा डोंगर! प्रसिद्ध दिग्दर्शक- छायाचित्रकाराचे हृदयविकाराने निधन, अनिल कपूरच्या चित्रपटात केले होते काम

-कोरोना काळात चांगली बातमी! टीव्ही अभिनेता मोहित बनला बाबा, पत्नी अन् मुलासोबतचा पहिला फोटो केेला शेअर

-कपूर कुटुंबाला मोठा धक्का! दिग्गज अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण, मुंबईच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले…

हे देखील वाचा