Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘हिंदुत्व खोट्यावर आधारित’ हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला अटक

कन्नड चित्रपट अभिनेता चेतन कुमार हा कन्नड इंडस्ट्रीमध्ये आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. त्याला ना केवळ साऊथ इंडस्ट्री तर संपूर्ण भारत, जगात ओळखले जाते. मात्र आता याच चेतन कुमारसंबंधी एक बातमी येत आहे. चेतनला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. हिंदू धर्माच्या विरोधात केलेल्या विवादित ट्विटमुळे त्याला ही अटक झाली आहे.

झाले असे की, चेतन कुमारने २० मार्च सोमवार रोजी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हिंदू धर्माबद्दल एक विवादित ट्विट केले. त्याने त्याच्या ट्विटमध्ये काही पॉईंट लिहिले आणि दावा केला की, हिंदुत्व खोट्यावर आधारित आहे. चेतनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले की, “रामाने रावणाचा पराभव केला आणि अयोध्येला परतले > एक खोटे. १९९२: बाबरी मशीद ही ‘रामाची जन्मभूमी’ -> एक खोटे, २०२३: उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे ‘खूनी’ आहेत -> खोटे, हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाऊ शकतो -> सत्य म्हणजे समानता”.

चेतन कुमारच्या या विवादित ट्विटमुळे त्याला बंगळुरूच्या शेषाद्रीपुरम पोलिसांनी २१ मार्च रोजी अटक केली आहे. त्याच्या या ट्विटवर आक्षेप घेत हिंदू संघटनांनी त्याचा तीव्र निषेध केला आहे. बजरंग दलाने आपला विरोध व्यक्त करत, ‘हा हिंदू धर्माचा अपमान’ असल्याचे म्हटले आहे.

चेतन कुमार पहिल्यांदाच असे विवादित विधान केले असे नाही. याआधी देखील त्याने अनेकदा धर्माबाबत वादग्रस्त विधाने केली होती. चेतन कुमारने ‘कांतारा’ या चित्रपटावर देखील त्याने अशीच टीका केली होती. त्यावेळी चेतन कुमार याने ‘कांतारा’ चित्रपटातील ‘भूता कोला’ धार्मिक प्रथेविरोधात भाष्य केले होते. एका हिंदू संघटनेने चेतनच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाज वाटत नाही का’ म्हणत नेटकऱ्यांनी तापसी पन्नूच्या ‘त्या’ नेकलेसवरून घेतली तिची शाळा

‘मी माझी पहिली सेलिब्रिटी सही घेतली’ अभिनेता ऋतुराज फडकेने सुनील बर्वेबद्दल शेअर केली खास पोस्ट

हे देखील वाचा