Monday, July 8, 2024

अंत्यसंस्कारादरम्यान दयनीय झाली पुनीतच्या पत्नी अन् मुलीची अवस्था, पाहून तुम्हाला आवरणार नाहीत अश्रू

कन्नड चित्रपटांचा सुपरस्टार पुनीत राजकुमारने वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोणीच या बातमीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. पण त्याच्या चाहत्यांमध्ये अश्रूंचा महापूर हा खरा होता. अजुनही पुनीतचे चाहते त्याचा मृत्यू सहन करू शकत नाहीत. माध्यमांतील वृत्तानुसार, आतापर्यंत तीन चाहत्यांनी हिंमत गमावून मृत्यूला कवटाळले आहे. अशातच काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

पुनीतची पत्नी अश्विनी आणि दोन्ही मुलींची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचे फोटो आणि व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. रडत त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांना सांभाळणे खूप कठीण होत आहे. दिवंगत पुनीतच्या पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून, आपल्या जोडीदारापासून विभक्त होण्याचे दु:ख कळू शकते.

दिवंगत पुनीतचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कांतीरवा स्टेडियममध्ये ठेवण्यात आले होते. तोपर्यंत अमेरिकेत राहणारी त्यांची लाडकी मुलगी आली नव्हती. पण वडिलांना असे पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे कसे सांभाळावे ते कोणालाच समजले नाही?

कुटुंबासोबतच चाहत्यांचीही दुरवस्था झाली आहे. एक वृद्ध महिला “माझेच मूल गेल्यासारखे वाटत आहे” असे म्हणत त्याला ओरडली आहे. इतर चाहत्यांचेही असेच आहे. एका चाहत्याने सांगितले की, “त्याचे शरीर जरी राहिले नसले, तरी ते त्यांच्या चित्रपटांद्वारे नेहमीच आमच्या हृदयात असतील.”

पुनीत राजकुमारला २९ ऑक्टोबरला सकाळी जिममध्ये असताना छातीत दुखू लागलं आणि त्याला तात्काळ बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. पुनितचे वडील डॉ. राजकुमार यांच्या स्मारकाजवळ त्याला दफन करण्यात आले. वडिलांप्रमाणेच त्याने नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्याचे अंतिम संस्कार पूर्ण राजकीय सन्मानाने करण्यात आले.

विशेष म्हणजे पुनीत राजकुमार यावेळी ‘जेम्स’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. यासोबतच त्याचा आगामी चित्रपट ‘दायित्व’च्या शूटिंगचीही योजना होती. एवढेच नाही, तर तो संतोष आनंदराम यांच्यासोबत एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-समोर आला मृत्यूच्या काही वेळापूर्वीचा व्हिडिओ, ‘केजीएफ’ स्टार यशसोबत थिरकाताना दिसला पुनीत राजकुमार

-पुनीतच्या निधनाची बातमी सांगताना, थेट प्रक्षेपणातच फुटला अँकरच्या अश्रूंचा बांध; पाहून पाणावतील तुमचेही डोळे

-पुनीतचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी, कर्नाटक सरकारला घ्यावा लागला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

हे देखील वाचा