कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमारने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अचानक या जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. पुनीत अवघ्या ४६ वर्षांचा होता आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. फिटनेस फ्रिक असलेल्या पुनीतने जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्याची तब्येत बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांना अपयश आले.
केलं गेलं अभिनेत्याचं नेत्रदान
अभिनेत्याने वडिलांप्रमाणे नेत्रदान केलं. त्याचे वडील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांनी स्वतः १९९४ मध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय डॉ. राजकुमार यांचाही २००६ साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पुनीतच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा तासांत डॉक्टरांच्या पथकाने ऑपरेशन केल्याचं अभिनेता चेतन कुमारने ट्वीट करून सांगितलं आहे. (kannada star puneeth rajkumar eyes donated just like his father did back in 2006)
While I was at hospital to see Appu Sir, a medical group came to remove his eyes in 6-hour window after death
Appu Sir—like Dr Rajkumar & @NimmaShivanna—donated his eyes
Following in their footsteps & in Appu Sir’s memory, we must all pledge to donate our #eyes as well
I do so pic.twitter.com/MsNAv5zGZC
— Chetan Kumar Ahimsa / ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ (@ChetanAhimsa) October 29, 2021
अभिनेत्याने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, “मी जेव्हा अप्पू सरांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर सहा तासांच्या आत डॉक्टरांची एक टीम त्यांचे डोळे काढण्यासाठी आली होती. डॉ. राजकुमार आणि निम्माशिवा यांच्याप्रमाणे अप्पू सरांनीही नेत्रदान केले आहे.” यासोबतच अभिनेत्याने हे उदाहरण म्हणून घेत, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इतरांना नेत्रदान करण्याचे आवाहन केले.
पुनीत केवळ अभिनेताच नव्हता, तर गायकही होता. त्याचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी झाला. त्याने २००२ मध्ये ‘अप्पू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्याने २९ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
पुनीत हे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. ते कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले कन्नड इंडस्ट्री अभिनेता होते. पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. शिवाय कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या अभिनेत्यांपैकी पुनीत एक होता.