Sunday, February 1, 2026
Home बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 74व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 74व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेते लक्ष्मण यांचे आज (सोमवारी, 23 जानेवारी) वयाच्या 74व्या वर्षी दुःखद निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना आज हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते लक्ष्मण यांनी तब्बल 200 हून अधिक चित्रपटात काम केले होते. त्यांच्या खलनायकी भुमिका विशेष गाजल्या.

छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर लक्ष्मण यांना नगरभवी येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र, आज म्हणजेच सोमवारी (दि.23 जानेवारी)ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव सध्या दर्शनासाठी ठेवण्यात आले असून आजच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुमलता अंबरीश यांनी व्यक्त केला शाेक
लक्ष्मण यांच्या निधनावर अनेक चित्रपट कलाकारांनी त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे. सुमलता अंबरीश यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मण यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांनी ‘अंतरा’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. थिएटर, टेलिव्हिजन आणि सिनेमा उद्योगात अभिनेते सक्रिय हाेते. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’

अभिनेत्याने चित्रपटात साकारल्या नकारात्मक भूमिका
‘दादा’, ‘हळुंदा थावरू’, ‘यजमान’, ‘सूर्यवंश’, ‘सांगलियाना’, ‘मल्ला’ हे अभिनेते लक्ष्मण यांचे लोकप्रिय चित्रपट आहेत. नुकतेच ते ‘रवी बोपोअण्णा’ या चित्रपटातही दिसले होते. अभिनेते त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकांसाठी ओळखला जातात. लक्ष्मण यांनी एकदा सांगितले की, तो सैन्यात भरती होणार होता पण त्याच्या आईने त्यांना थांबवले आणि मग त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.(Famous actor lakshman passes away at the age of 74)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा