Monday, July 1, 2024

कांतारा का अडकलाय वादाच्या भोवऱ्यात? जाणून घ्या एका क्लीकवर

सध्या बॉक्सऑफीसवर एकाच चित्रपटाचा बोल बाला सुरु आहे तो म्हणजे कांतारा. या चित्रपटाने अनेक चित्रपटांना मागे सोडले आहे. कंतारने बाकीच्या चित्रपटांसाठी नवीन रेकॉर्ड उभा केला आहे. या चित्रपटाने चाहत्यांवर भुरळ घातली असून अजूनही रेटिंग वाढतच आहे. मात्र, या गळ्यामध्ये या चित्रपटामुळे वादाची ठिणगी पेटलेली दिसत आहे.

कांतारा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे, त्यांमुळे बॉलिवूडचे चित्रपट अजय देवगन (Ajay Devgon) याचा ‘थॅंक गॉड’ आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘राम सेतु’ यांना चांगलीच माती चारली आहे. कांतारने आतापर्यत तब्बल पावने दोनशे कोटींची कमाई केली आहे. हे सगळं होत असताना मात्र, अचानकच चित्रपट वादाच्या घेऱ्यामध्ये अडकला आहे.

कांतारा हा चित्रपट गेल्या महिन्यतच कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित झाला असून चांगलाच गाजला होता. आता तो हिंदीमध्ये  प्रदर्शित झाला असून बॉलिवूडच्या प्रेक्षकांवर देखिल भुरळ घातली आहे. कन्नड सरकारवर या चित्रपटाचा चांगलाच प्रभाव पडला असून त्यांच्या सरकारने एक धोरनात्मक निर्णय घेतला आहे. ‘साठ वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केलेल्या देवाच्या नर्तकांना महिना दोन हजार रुपयांचा मासिक भत्ता दिला जाणार आहे.’ त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे कांतारामध्ये जी भूत कोला नावाची जी परंपरा दाखविण्यात आली आहे. त्याचे अनेक संदर्भ हिंदू धर्मात सापडतात. असे सांगितले जाते

कर्नाटकातील एका गावामध्ये भूत कोलाची ही रुढी परंपरा अजूनही पाळली जाते. गावातील गावकरी ज्या व्यक्तीच्या अंगामधये देव येतो त्याची पुजा करतात. ती व्यक्ती देवासारखी वेशभूषा घेऊन जमा असलेल्या लोकांशी सतत संवाद साधत असते. अशावेळी लोकं तिच्या पाया पडताना दाखवले आहे. देवाची वेशभूषा घेतलेली व्यक्ती नाचू लागते आणि नाचता नाचता त्याच्या अंगामध्ये देव येतो. देव त्याच्या रुपाने सगळ्यांशी बोलू लागतो असे गावकरी मानतात. सगळी लोकं त्यांच्या अडचनी देवाला सांगतात आणि देव त्यांच्या अडतचणींवर उपाय देखिल सांगतात. हा चित्रपटही अशाच रुढी परंपरेवर आधारित आहे. त्यामुळे अनेकांनी चित्रपटामधील पाया पडण्याच्या सिनवर टीका केली आहे. कीहींनी तर असेही म्हणले आहे की हा चित्रपट अंधश्रद्धेला पाठिंबा देत आहे. त्यामुळे चित्रपटाला घेऊन चांगलाच वाद पेटला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ चित्रपटगृहांमध्ये घालतोय धुमाकूळ, 4 नोव्हेंबरला होणार ओटीटीवर रिलीज?
अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीमध्ये का झाली मारामारी? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा