Saturday, July 6, 2024

किम कार्दशियनला घटस्फोट देऊ इच्छित नाही अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट; म्हणाला ‘मी घटस्फोटाची कागदपत्रे…’

असे म्हटले जाते की, प्रेम ही अशी गोष्ट आहे की, ती कधीच विसरता येत नाही. एखाद्या व्यक्तीवर प्रेम केले आणि काही कारणास्तव त्या नात्यात दरी निर्माण झाली, तर ते नाते असे तोडल्याने तुटू शकत नाही. अनेक लोक लग्न केल्यानंतर नात्यात दुरावा आल्याने घटस्फोट घेतात. पण मनात कुठेतरी आपल्या व्यक्तीसाठी प्रेम उरतेच. असेच काहीसे रियॅलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि रॅपर कान्ये वेस्ट यांच्याबाबतीत घडले आहे.

किम कार्दशियनने या वर्षाच्या सुरुवातीला घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु असे दिसते की, अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट हे मान्य करू इच्छित नाही. कान्ये शुक्रवारी (५ नोव्हेंबर) ‘ड्रिंक चॅम्प्स’मध्ये दिसला. त्याच्या प्रसिद्ध रॅपपासून ते वडील म्हणून त्याचा प्रवास कसा गेला, यावर येथे मोकळेपणाने चर्चा केली आहे. जेव्हा त्याला त्याच्या सहा वर्षांच्या लग्न आणि घटस्फोटाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो म्हणाला की, “किम माझी पत्नी आहे आणि मी अद्याप घटस्फोटाची कागदपत्रे पाहिली नाहीत. माझ्या मुलांना त्यांच्या पालकांनी त्यांच्यासोबत असावे असे वाटते. आम्ही एकत्र राहावे अशी माझी इच्छा आहे.”

कान्ये वेस्टला किमपासून व्हायचे नाही वेगळे
कान्ये वेस्टने अलीकडेच म्हणाला की, त्याला अजूनही तिच्यासोबत राहायचे आहे. किमच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, “हे खरे आहे की, कान्येला अजूनही आशा आहे की, तो त्याचे नाते व्यवस्थित करू शकतो.”

माध्यमांतील वृत्तानुसार, यावेळी नाते ठीक होण्याची शक्यता नाही. दुसर्‍या सूत्रानुसार, कान्येच्या या कमेंटमुळे किमला अजिबात आश्चर्य वाटत नाही. तिला माहित आहे की, तिच्या मनात अजूनही भावना आहेत आणि ती व्यक्त करण्यास ती कमी पडत नाही. कान्येने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याला घटस्फोट नको आहे आणि किमने यावर आणखी एकदा विचार करावा अशी त्याची इच्छा आहे.

सूत्रानुसार, किमने तिचे लग्न वाचवण्यासाठी बराच काळ प्रयत्न केला. पण अखेर ब्रेकिंग पॉईंट गाठला आहे. आणखी एका सूत्रानुसार, कान्येला अजूनही आशा आहे की, किम आपला विचार बदलेल. पण तिला त्याच्यासोबत परत जाण्यात रस राहिलेला नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, किम एसएनएल स्टार पीट डेव्हिडसनला डेट करत आहे. दोघे न्यूयॉर्क शहरात एकत्र हँग आउट करताना दिसले. मात्र, किम सध्या कोणाला डेट करू इच्छित नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा