अमेरिकन दिग्गज रॅपर कान्ये वेस्ट हा नेहमीच त्याच्या आयुष्यातील कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी तो किम कार्दशियन हिच्यासोबत झालेल्या घटस्फोटामुळे तो चर्चेत होता. पण आता तो त्याच्या स्निकर शूजमुळे चर्चेत आहे. कान्ये वेस्ट याचा एक बूट तब्बल 1.8 मिलियन डॉलर म्हणजेच 13 कोटी 41 लाखांपेक्षा जास्त किमतीत विकला गेला आहे. हा आतापर्यंतच्या स्निकर बूट विक्री किमतीचा सर्वात मोठा विक्रम आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, कान्येने हा Nike Air Yeezy 1s हा बूट ग्रॅमी पुरस्कारांमध्ये घातला होता.
याआधी ऑगस्ट 2020 मध्ये झालेल्या एका निलावामध्ये Nike Air Jordan 1s या बुटाने सगळ्यात जास्त विक्री किमतीचा रेकॉर्ड बनवला होता. या बूटाची 6. 15 लाख डॉलर एवढ्या किमतीत विक्री झाली होती. परंतु कान्येचे हे बूट तीन पट जास्त किमतीने विकले गेले आहे. ज्याने एक विक्रम बनवला आहे.
BREAKING: The 2008 “Grammy”-worn Air Yeezys have been acquired for $1.8 Million by sneaker investing platform @RaresApp — the highest publicly recorded price for a pair of sneakers ever.
The Rares App will offer SEC backed fractional investment ownership & tradable shares. pic.twitter.com/BbUiM8xwMx
— Nick DePaula (@NickDePaula) April 26, 2021
माध्यमांतील वृत्तांनुसार, या बूटाने विक्री किमतीत सार्वजनिक रुपात एक विक्रम बनवला आहे. 2008 मध्ये झालेल्या ग्रॅमी पुरस्कारात कान्येने हे काळ्या रंगाचे बूट घातले होते, तेव्हा त्याने ‘हे मामा’ आणि ‘स्ट्राँगर’ गाण्यांवर डान्स केला होता.
हे स्निकर बूट नाईके आणि कान्ये वेस्ट यांच्यामधील एक भाग आहे. कान्येच्या या बूटाला लिलावामध्ये Rares यांनी खरेदी केले आहे. हे एक स्निकर्स इन्वेस्टमेंट मार्केटप्लेस आहे. जे लोकांना असे शूज खरेदी करण्याची संधी देतात.
कोणताही व्यक्ती Rares मधून बूट खरेदी करू शकतो, पण त्यासाठी त्याला कंपनीचे काही शेअर्स विकत घ्यावे लागतात. अमेरिकेचा माजी फुटबॉलपटू गेरोम सॅप याने मार्चमध्ये Rares मधील प्रायव्हेट सेलमधून हे शूज खरेदी केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-