पुन्हा कपिल शर्मा अडकला वादात! फोटोग्राफरला केली शिवीगाळ, चाहतेही व्हिडीओ पाहून झाले अवाक्


कपिल शर्मा हा छोट्या पडद्यावरील एक मोठा कलाकार आहे. द कपिल शर्मा शो मधून हा कलाकार सदैव चाहत्यांना हसवत असतो. कपिलच्या या शोचा मोठा चाहतावर्ग भारतासह परदेशात आहे. या शोमध्ये कपिल अनेक मोठ्या सेलिब्रेटींना बोलावतो. परंतू कपिलचा हा शो व स्वत: कपिल कायमच वादात सापडतो. आता कपिल असाच काहिसा वादात सापडला आहे.

सोमवारी कपिल शर्मा मुंबई विमानतळावर दिसला. या दरम्यान कपिल व्हीलचेयरवर बसलेला दिसला. मात्र, त्यावेळी कपिलचा मूड खूपच खराब होता. कारण फोटोग्राफरला पाहून तो खूप रागावला होता. कपिल सर्वांना म्हणाला, “चला निघा इथून”. यानंतर जेव्हा फोटोग्राफर बाजूला सरकतात, तेव्हा कपिल त्यांना ‘उल्लू के पट्ठे’ असे म्हणतो.

कपिलचे हे शब्द ऐकून कॅमेरामॅन म्हणतो, “हे रेकॉर्ड झाले आहे सर, थँक्यू”. कपिलचा हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वापरकर्ते त्याला बरेच ट्रोल करत आहेत. एकाने कमेंट केली, “कपिल शर्मामध्ये इतका घमंड? इतका गर्व आहे की एखाद्या मोठ्या स्टारलाही नसेल”. तर दुसरा वापरकर्ता म्हणाला, “आता कपिलचा पीआर कॉल करून हा व्हिडिओ डिलीट करायला सांगेल, परंतु तुम्ही ते करू नका. कपिलचे हे रूप सर्वांनाच दिसायला हवे.”

दुसरीकडेे, कपिलचे चाहते त्याला कव्हर करत त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, “कपिल त्यावेळी चिंतेत असेल आणि अशा परिस्थितीत कॅमेरा पाहून तो जरासा चिडला असावा, हे कोणासोबतही घडू शकते.”

काही दिवसांपासून कपिल शर्माचा शो बंद आहे. तथापि, हा शो कायमचा थांबलेला नाही. काही वेळाच्या ब्रेक नंतर शो पुन्हा सुरू केला जाईल. आत्तापर्यंत कोविडमुळे शोमध्ये प्रेक्षक सेटवर जात नव्हते, पण जेव्हा हो पुन्हा सुरु होईल तेव्हा प्रेक्षक पुन्हा दिसतील.

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.