Wednesday, July 3, 2024

कपिल शर्मा क्रिकेटपटूंच्या ‘लव्ह मॅरेज’वर बोलला ‘असे’ काही, जे ऐकून वीरेंद्र सेहवाग झाला लोटपोट

सोनी टीव्हीचा सुप्रसिद्ध शो ‘द कपिल शर्मा शो’ने मागील दोन पर्वापासून प्रेक्षकांना पोटभर हसविण्याचा विडा उचलला आहे. सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या पर्वात या शोने कॉमेडीचा डोस डबल केला आहे. त्याचबरोबर प्रत्येक नवीन एपिसोडमध्ये नवीन नवीन पाहुणे येत असतात. मग ते फक्त बॉलिवूड संबंधितच असतील असे नाही. तर या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रिटी आपली हजेरी लावतात. अशाच दोन सेलिब्रिटींनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे.

याच्या नवीन एपिसोडमध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ हे दोन खेळाडू येणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा आणि दोन्ही खेळाडू एकमेकांसोबत मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. (kapil sharma asked a funny question on the love marriage of cricketers you will not be able to stop laughing)

या व्हिडिओच्या सुरुवातीला कपिल वीरेंद्र सेहवागला विचारतो की, “जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरगुती मदत करणारे उपलब्ध नव्हते, तेव्हा तुम्हाला घरचे काम करावे लागले असेल ना?” यावर सेहवाग असे काही उत्तर देतो, ऐकून सगळेच खूप हसायला लागतात. तो कपिल शर्माला आठवण करून देतो की, तो नजफगडचा नवाब आहे, मग तो काम करेल का?

कपिल या व्हिडिओमध्ये पुढे असे सांगतो की, वीरेंद्र सेहवाग जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये असायचा, तेव्हा तो काही ना काही विनोद करायचा. त्याला शांत बसवण्यासाठी सचिन त्याला केळी खायला द्यायचा. त्याचबरोबर मग पुढे कपिल सेहवागला विचारतो की, “जर तु्म्हाला केळी द्यायची असेल, तर ती तुम्ही कोणाला देणार?” असे म्हणताच सेहवाग टेबलावर ठेवलेली केळी उचलतो आणि कपिलला देतो. मात्र, सेहवाग ती केळी परत घेतो आणि म्हणतो की, “जर तु शांत राहिलात तर शो थांबेल. शो फक्त तुझ्यामुळे चालतो.”

या व्हिडिओमध्ये पुढे कपिल खेळाडूंच्या प्रेमविवाहाबद्दल बोलतो. तो म्हणतो की, अनेक क्रिकेटपटूंनी लव्ह मॅरेज केले आहेत. कपिल मोहम्मद कैफला विचारत म्हणतो की, “लव्ह मॅरेज केल्यानंतरही तुम्हाला बाहेर फिल्डिंग करण्यासाठी वेळ कसा मिळतो?” कपिल पुढे म्हणतो की, तुम्ही एक उत्कृष्ट फिल्डर आहात, म्हणूनच मी विचारत आहे. कपिलचं हे बोलणं ऐकून वीरेंद्र सेहवाग जोरजोरात हसायला लागतो. त्याचबरोबर या शोचे बाकीचे कॉमेडियनसुद्धा सेटवर क्रिकेटपटूंबरोबर विनोद करताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ओह लडकी ऑंख मारे! उर्वशी रौतेलाच्या नजरेच्या बाणाने चाहते झाले पुरते घायाळ

-सतत बदलणाऱ्या मूडमध्ये ‘हा’ आहे बेबोचा ‘फॉरएव्हर मूड’; पोस्ट शेअर करून दिली माहिती

-‘टायगर ३’साठी शूट केले जातायेत जबरदस्त ऍक्शन सीन्स; तुर्कीनंतर आता ‘या’ देशात होणार चित्रपटाची शूटिंग

हे देखील वाचा