Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड सर्वात महागडा कॉमेडियन! आलिशान घर ते कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचा मालक आहे कपिल शर्मा, प्रॉपर्टी पाहून डोळेच फिरतील

सर्वात महागडा कॉमेडियन! आलिशान घर ते कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचा मालक आहे कपिल शर्मा, प्रॉपर्टी पाहून डोळेच फिरतील

कपिल शर्मा आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या शोमुळे तो इतका प्रसिद्ध झाला की, आज तो टीव्हीचा सर्वात मोठा आणि महागडा कॉमेडियन आहे. कपिलने स्वत: बर्‍याच वेळा सांगितले आहे की, त्याने 15 कोटींचा कर भरला आहे. हे त्याने 2016 मध्ये सांगितले होते. याखेरीज 2019 मध्ये, फोर्ब्सच्या सर्वात महागड्या सेलिब्रिटीच्या यादीत कपिलचा समावेश झाला. माध्यमातील वृत्तानुसार, वीकेंडच्या एपिसोडसाठी तो जवळपास एक कोटी रुपये घेतो. कोट्यवधी उत्पन्न असलेल्या कपिल शर्माचे आयुष्य खूप विलासी आहे. चला तर मग जाणून घेऊया की, त्याच्याकडे कोणत्या महागड्या वस्तू आहेत.

व्हॅनिटी व्हॅन
कपिल शर्मा अनेकदा त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधील फोटो शेअर करत असतो. शाहरुख-सलमानच्या व्हॅनिटीप्रमाणेच त्याची व्हॅनिटी महागडी आहे. त्याची किंमत साडेपाच कोटी असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

मुंबईतील निवासस्थान
मुंबईच्या अंधेरी वेस्टमध्ये कपिलचे घर आहे. जिथे तो त्याची पत्नी, मुले आणि आईसह राहतो. तो त्याच्या आलिशान अपार्टमेंटमधून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या बाल्कनीत झाडे-झुडपे आहेत व काचेचे पॅनेल आहे. त्याच्या या घराची किंमत सुमारे 15 कोटी आहे.

पंजाबमधील निवासस्थान
कपिल शर्माकडे मुंबईव्यतिरिक्त पंजाबमध्ये देखील बरीच प्रॉपर्टी आहे. पंजाबमध्ये त्याच्याकडे आलिशान बंगला आहे. मुंबईतून वेळ मिळाल्यावर कपिल त्याच्या पंजाबच्या घरी जात असतो.

महागड्या गाड्या
कपिल शर्माला महागड्या गाड्यांचा खूप छंद आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार आहेत. अशीच एक एसयूव्ही कार व्होल्वो एक्ससी 90 (Volvo XC90) आहे. बाजारात त्याची किंमत 1.25 कोटी रुपये इतकी आहे.

मर्सिडिझ बेंझ-
कपिल शर्मा बहुधा त्याच्या मर्सिडिझ बेंझमधून जाताना दिसतो. त्याच्याकडे एक मर्सिडिझ बेंझ एस 350 सीडीआय (Mercedes Benz S350 CDI) आहे. याची किंमत सुमारे 1.19 कोटी रुपये आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-घर पाहावे बांधून! सोनम कपूरचे राजधानी दिल्लीतील ‘इतक्या’ कोटींचे अलिशान घर पाहिलंय का?

-‘शोले’ चित्रपटात सांभाची भूमिका निभावलेल्या अभिनेत्याने ‘त्या’ एका डायलॉगसाठी केला तब्बल २७ वेळा ‘मुंबई ते बँगलोर’ प्रवास

-बहीण आरतीने खरेदी केली आलिशान जीप, भाऊ कृष्णा अभिषेकचे मन आले भरून; ‘असे’ केले अभिनंदन

हे देखील वाचा