Thursday, July 18, 2024

काय वेळ आली ही! कपिल शर्माचा ‘हा’ कॉमेडियन रस्त्यावर विकतोय चहा, व्हिडिओ आला समोर

फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोव्हरने (Sunil Grover) कपिल शर्माचा (Kapil Sharma) शो सोडला असेल, पण आजपर्यंत त्याने साकारलेली ‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर मशहूर गुलाटी’ची भूमिका प्रेक्षक विसरलेले नाहीत. सुनील आता पुन्हा त्या शोचा भाग कधी होणार, याची चाहते वाट पाहत आहेत. सुनील परत कधी येणार किंवा तो येणार की नाही, हे काळच सांगेल. पण कॉमेडियन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नक्कीच जोडलेला असतो.

सुनील सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. आपल्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन अनेकदा चाहत्यांना मनोरंजन करण्यासाठी काही ना काहीतरी करत असतोच, जे चर्चेत येते. चाहत्यांना सुनीलला प्रत्येक रूपात पाहायला आवडते, तर अभिनेता देखील चाहत्यांना खूश करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच सुनीलने पुन्हा असे काही केले आहे, जे इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहे. (kapil sharma fame actor sunil grover selling chai video viral)

वास्तविक, कॉमेडियनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावर चहा विकताना दिसत आहे. मजेदार गोष्ट म्हणजे, सुनील केवळ चहा विकत नाहीये, तर तो स्वतः चहा देखील बनवत आहे. अभिनेत्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि लोक त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कॉमेडियन चहाच्या स्टॉलजवळ उभा आहे आणि त्याच्या शेजारी एक महिला उभी आहे जी कदाचित चहाचा स्टॉल चालवत असेल. ती महिला बाजूला उभी आहे आणि सुनील ग्राहकांसाठी चहा बनवत आहे. दरम्यान त्याच्या स्टॉलवर एकही ग्राहक नसला, तरी कलाकार मात्र पूर्ण तल्लीन होऊन चहा बनवताना दिसतात.

सुनीलचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत, तर काही जण कपिलचा शो सोडल्यानंतर त्याला चहा विकावा लागल्याचे, सांगत त्याची खिल्ली उडवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा