Monday, August 4, 2025
Home टेलिव्हिजन धक्कादायक हल्ल्यानंतर कपिलचा माेठा निर्णय!

धक्कादायक हल्ल्यानंतर कपिलचा माेठा निर्णय!

प्रसिद्ध काॅमिडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांचं ‘कॅप्य कॅफे’ (Kap’s Cafe) गाेळीबाराच्या घटनेनंतर आता पुन्हा सुरु झालं आहे.कॅफेमध्ये पाेलिस अधिकारी पाहुणे म्हणुन आले हाेते.कपिलने हे खास क्षण आपल्या साेशल मीडियावर शेअर केले आहेत.

काॅमिडियन कपिल शर्माने कॅनडामध्ये ‘कॅप्य कॅफे’ नावाचं एक कॅफे सुरु केलं आहे.काही दिवसांपूर्वी या कॅफेवर हल्ला झाला हाेता,ज्यामुळए सगळेच धक्क्यात हाेते.पण 20 जुलैला कपिलने सांगितलं की त्याचा कॅफे आता पुन्हा सुरु झालाय. आता त्याने काही फाेटाे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत,ज्यात पाेलिस अधिकारी कॅफेमधील टेस्टी पदार्थांचा आनंद घेताना दिसत आहेत.याचसाेबत कपिलने या गाेळीबाराच्या घटनेवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.चला,पाहूया काय म्हणाला आहे ताे.

कपिल शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कॅनडाच्या सरे शहरातले पाेलिस अधिकारी त्याच्या कॅफेमध्ये आलेले दिसत आहेत.ते तिथले टेस्टी पदार्थ चाखताना आणि हसत-हसत एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात.याचसाेबत कपिलने अजून एक पाेस्ट टाकून त्यावेळचे काही फाेटाेही शेअर केले आहेत.काॅमिडियन कपिल शर्माने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे “मेयर ब्रेंडा आणि सरे शहराचे सगळे पाेलिस अधिकारी,तुम्ही आमच्या कॅफेमध्ये आलात प्रेम आणि साथ दिलीत,त्यासाठी खूप धन्यवाद.आपण सगळे मिळून हिंसेविराेधात उभं राहू शकताे.आम्ही तुमचे आभारी आहाेत”.

काॅमिडियन कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांनी कॅनडामध्ये एक कॅफे सुरु केला हाेता.पण काही दिवसांत त्या कॅफेवर हल्ला झाला.पाेलिसांच्या म्हणण्यानुसार,10 जुलै राेजी पहाटे 1:50 वाजता सरे शहरातल्या ‘कॅप्य कॅफे’ च्या बाहेर गाेळ्या झाडण्यात आल्या. त्या वेळी काही कर्मचारी कफॅमध्येच हाेते,पण नशिाबाने या घटनेट काेणीही जखमी झालं नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

जेव्हा धनुषने खोटं बोलून काजोलला चित्रपटासाठी साईन केलं; अभिनेत्रीने नुकताच सांगितला संपूर्ण किस्सा… 

हे देखील वाचा