प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या हजरजबाबीपणामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या कॉमेडी शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांची तो नेहमीच थट्टा मस्करी करताना दिसत असतो. त्याच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकही भरभरुन प्रतिसाद देत असतात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्या त्याच्या नेटफ्लिक्सवरील ‘i am not done yet’ या नवीन कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमात त्याने माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्याबद्दल एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
प्रसिध्द कॉमेडियन कपिल शर्माचा (kapil sharma) नवीन कार्यक्रम ‘I am Not Done Yet’ सध्या नेटफ्लिक्सवर चांगलाच चर्चेत असलेला कार्यक्रम आहे. या एका तासाच्या कार्यक्रमात कपिलने आपल्या संघर्षाचा प्रवास, अनेक दिग्गज व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखती यांचा उल्लेख केला आहे. याच कार्यक्रमात कपिलने देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीदरम्यानचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. हा किस्सा २०१९ मध्ये घडलेला आहे.
या सुंदर क्षणाच्या आठवणी सांगताना कपिल शर्माने इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला ही घरामध्ये किती सक्ती आहे याच एक उदाहरण दिले आहे. या घटनेबद्दल बोलताना कपिलने सांगितले की, ”एकदा सुदैवाने मला मनमोहनसिंग यांना भेटण्याची संधी मिळाली. ते आमच्या शहरातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. यावेळी थंडीचे दिवस चालू होते आणि मनमोहनसिंग यांनी रेवड्या खायला मागवल्या होत्या. ज्यावेळी त्यांनी रेवड्या खायला मुठ भरली त्याचवेळी त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी आल्या आणि त्यांचा हात पकडत नाही, डॉक्टर साहेब तुम्हाला हे खाण्याची परवानगी नाही असाच इशारा दिला. ”
हा सगळा प्रकार पाहुन कपिल शर्माने सांगितले की, ”मी विचारात पडलो या माणसाने १० वर्ष देश चालवला आहे. एका वर्षाची एक रेवडी पकडली तरी निदान त्यांना १० रेवड्या तरी खायला दिल्या पाहिजेत”. यानंतर कपिलने प्रधानमंत्र्यासोबतचा फोटोही आपल्या प्रेक्षकांना दाखवला ज्यामध्ये त्यांनी हातात एक रेवडी पकडलेली दिसत आहे. शेवटी काय ग्रेट माणूस आहे म्हणत त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताना कपिल शर्मा खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला.
हेही वाचा :