Wednesday, April 16, 2025
Home बॉलीवूड ‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

‘मुलं जन्माला घालायला वेळ कधी मिळतो?’, मलायकाने विचारलेल्या प्रश्नावर कपिलचे मजेशीर प्रत्युत्तर, म्हणाला…

अभिनेता आणि कॉमेडिअन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आल्यावर सर्वांचेच टेन्शन गुल होते. या शोच्या सेटवर कलाकारांपासून ते राजकारणी आणि क्रीडा तसेच अन्य क्षेत्रातील मोठ- मोठे कलाकार नेहमीच येत असतात. या शोमध्ये आल्यानंतर प्रत्येकच व्यक्ती खळखळून हसते आणि प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होते. शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक कलाकारावर इथे पंच काढले जातात. अशात या कलाकारांवर त्यांच्या कामावरुन विनोद केले जातात तसेच त्यांच्या खासगी आयुष्यावर देखील हमखास बोलले जाते. अशात आता या सेटवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’चे तिन्ही परीक्षक येणार आहेत.

मलायका अरोरा, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस हे तिघे पुढील भागामध्ये दिसणार आहेत. या भागाचा प्रोमो व्हिडिओ सोनी टीव्ही चॅनेलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये मलायका कपिलला एक खूपच खासगी प्रश्न विचारते आणि कपिल देखील त्याचे पटकन उत्तर देताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर मलायका कपिलला म्हणते, “आम्ही सिझननुसार काम करतो. आमच्या शोचा सिझन संपला की, आम्हाला सुट्टी मिळते, पण तुमचा शो रोजच सुरू असतो. तुला हे सगळ करायला कधी वेळ मिळतो.” यावर गीता कपूर लगेच म्हणतात की, “म्हणजे लहान मूल का?” मलायका लगेच हो बोलते.

मग काय कपिल देखील न लाजता उत्तर देत म्हणतो की, “आमचा शो ९.३० ते ११ पर्यंत असतो. त्यानंतर सीआयडी सुरू होते. त्यावेळी आम्ही आमचं काम करतो.” त्याचे हे उत्तर ऐकून पूर्ण सेटवर एकच हशा पिकतो. सर्वजण मोठ्याने हसू लागतात.

त्यांनतर कपिल गीता कपूर आणि टेरेन्स लुईसबरोबर देखील खूप गप्पा मारतो, खूप विनोद करतो. हे सर्व ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागामध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुखी आयुष्याला ४ वर्षांनी पुर्णविराम! समंथा अन् नागा चैतन्यने घेतला घटस्फोट; जोडप्याच्या निर्णयाने चाहते दु:खी

-सुरू होण्यापूर्वीच ‘बिग बॉस १५’च्या घरातील व्हिडिओ झाला लीक; यावेळी ‘असे’ असेल ‘बिग बॉस’चे घर

-शर्टची बटणं खोलून साराने हॉट फोटो केले शेअर, तिच्यावरून नजर हटविणंही झालंय कठीण

हे देखील वाचा