Saturday, June 29, 2024

अर्चना पूरन सिंगच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सना कपिल शर्माने केली विनंती; म्हणाला, ‘अनफॉलो करून टाका…’

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या मजेदार उत्तरांसाठी ओळखला जातो. कपिल प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची तसेच स्पॉट रिस्पॉन्स देण्याची एकही संधी सोडत नाही. तो नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर विधान करत असतो. अशा परिस्थितीत, अलीकडेच अर्चना पूरन सिंगने ‘द कपिल शर्मा शो’चा ‘बिहाइंड द सीन’ व्हिडिओ शेअर केला आहे. जिथे कपिल तिला म्हणतो की, त्यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सनी त्यांना अनफॉलो करायला पाहिजे.

कपिलने गायले गाणे
अर्चनाने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला कपिल शर्मा ‘कजरा मोहब्बत वाला’ हे गाणे गाताना दिसत आहे. जेथे प्रेक्षक त्याला चीयर्स करत आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा कपिलने पाहिले की, अर्चना व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तेव्हा अभिनेता म्हणतो की, “अर्चना जींच्या चाहत्यांना माझी विनंती आहे, जे त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात, त्यांनी फॉलो करणे थांबवा.”

अर्चना-कपिलचा मजेशीर संवाद
हे ऐकून अर्चना आश्चर्यचकित होऊन विचारतात की, “असे का?” ज्याला कपिल विनोदाने उत्तर देतो, “असे का म्हणजे. आम्ही इतकी शूटिंग करत नाही, तितकी तुम्ही करता.” यानंतर अर्चना म्हणतात की, “तुझ्या चाहत्यांना विनंती कर की, तुला फॉलो करणे थांबवा आणि मला फॉलो करा. तू तर पोस्ट करत नाही, मी तरी पोस्ट करते.”

कपिलचे ३४.३ मिलियन फॉलोअर्स
अर्चनाने तिच्या पोस्टसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “बिहाइंड द सीन, जिथे कंटेंटच किंग आहे आणि हा कंटेंट किंग आहे.” कपिल शर्माचे इंस्टाग्रामवर ३४.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर अर्चनाला १.१ मिलियन चाहते इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दुःखद! मल्याळम अभिनेता रिजाबावा यांचे दीर्घ आजाराने झाले निधन

-सिद्धार्थच्या निधनानंतर ॲडमिट झाली होती जसलीन, नवीन व्हिडिओमुळे पुन्हा झाली ट्रोल

-Bigg Boss OTT: ‘राकेश तालावर नाचणारा नाहीये’, काम्या पंजाबीने साधला शमिता शेट्टीवर जोरदार निशाणा

हे देखील वाचा